अॅग्रोवन वृत्तसेवा
Onion Rate : नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १९) कांद्याला दीडशे ते २५०० रुपयांचा प्रतिक्विटंल दर मिळाला. मागील लिलावाला १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता, मात्र कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सोमवारच्या लिलावात आठशे रुपयांनी प्रतिक्विटंलमागे वाढ झाली.
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या दररोज एक लाख गोण्यांपर्यंत आवक होत असते. अलिकडच्या पंधरा दिवसांत बाजारात कांद्याची आवक वाढली होती. मात्र कांदा निर्यातबंदी असल्याने कांद्याला दर मिळत नव्हता, अलिकडच्या महिनाभरात तर कांद्याचे दर पुन्हा खाली आले होते.
दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यातबंदी उठवण्याबाबत हालचाली सुरू झाल्यानंतर लगेच कांद्याच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारी ६१ हजार गोण्याची आवक झाली व १५० ते २५०० रुपये तर शनिवारी (ता. १७) ८० हजार ७३९ गोण्याची आवक होऊन १०० ते १६०० रुपयांचा दर मिळाला.
कालच्या लिलावातील कांदादर
(कंसात शनिवारचे दर)
- १ नंबर ः २ हजार ते २,५०० (१,१०० ते १,६००)
- २ नंबर ः १,२०० ते २,००० (५५० ते १,१५०)
- ३ नंबर ः ६०० ते १,२०० (२५० ते ५५०)
- ४ नंबर ः १५० ते ६०० (१०० ते २५०)
सरासरी दर ः १६५० ते २५०० (१०५० ते १६००)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.