Onion Price : तीन दिवसात कांद्याने वांदा केला; कांदा आला फक्त १ रूपये प्रतिकिलो

Onion Market : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सतत पडत आहेत. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मागील तीन दिवसात सोलापूरच्या बाजारात कांद्याची विक्रमी आवक झाल्याने कांद्याचा भाव पुन्हा एकदा घसरला.
Onion Price
Onion PriceAgrowon

Pune News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी दर पडण्याच्या संकंटातून अजूनही निघालेला नाही. उलट गेल्या दोन दिवसापासून यात घसरणच पाहायला मिळत आहे. २५ फेब्रुवारीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी झाल्याने तर मार्केटच दोन दिवस बंद राहणार असल्याने कांद्याचे भाव गडगडले होते. येथे कांद्याच्या दरात २०० रूपयांनी घसरण झाली होती. त्यापाठोपाठ आता या दोन दिवसात देखील कांद्याची कधी नव्हे तेवढी विक्रमी आवक झाल्याने कांद्याचा दर पुन्हा पडला आहे. येथे कांदा तीन दिवसांत फक्त एक रुपये किलोने गेला आहे. म्हणजे १०० रुपये प्रति क्विंटल.

कांद्याच्या निर्यातीनंतर महाराष्ट्रातील बाजारपेठेत आवक वाढली आहे. जिथे पूर्वी काही हजार क्विंटल कांद्याची आवक होती, तिथे आता एका दिवसात एक लाख क्विंटलपर्यंत कांदा विक्रीसाठी येत आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत २० ते २५ जानेवारीपर्यंत कांद्याची ३ लाख क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे येथे कांद्याचे भाव पडले होते. याचा सरळ सरळ अर्थ असाच की सरकारच्या मनात जे होते तो हेतू साध्य झाला आहे.

Onion Price
Onion Market Lasalgaon : १६ दिवसानंतर कांद्याचे लिलाव सुरू, काय मिळत आहे कांद्याला भाव?

या आठवड्याचा विचार केल्यास सोलापूरच्या बाजार समितीत जवळपास १.५ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक ही २५ जानेवारीला झाली. तर त्याच्याआधी २३ जानेवारीला जवळपास १ लाख क्विंटल आणि त्याच्याही आधी २० जानेवारीस सुमारे ७५ लाख क्विंटल कांदा आला होता. या झालेल्या विक्रमी आवकीमुळे कांद्याचे भाव पडल्याचे तर या तीन दिवसांत किमान भाव केवळ एक रुपये किलो मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे म्हणण्याप्रमाणे प्रति क्विंटल फक्त १०० रूपये भाव.

कांदा उत्पादकासाठी निर्णय व्हायला हवा

या आठवड्याचा विचार केल्यास कांद्याचे भाव हे काही सामाधानकारण नाहीत. सतत कांद्याचे दर हे पडतच आहेत. त्याला केंद्र सरकारची निर्यात बंदी हेच कारण आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा शेती वाचवायची असेस तर सरकारने लवकरात लवकर निर्यात बंदी उठवण्याचे धोरण स्विकारून शेतकऱ्याला आधार द्यावे असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.

Onion Price
Agrowon Podcast : कांद्याचे भाव नरमले

शेतकऱ्यांनी करावे तरी काय?

सध्या खरीप हंगामातील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत आहे. साठवण करण्यात मर्यादा येत असल्याने तो बाजारात आणला जात आहे. तर आता रब्बी हंगामातील साठवलेला कांदा देखील मार्चनंतर बाहेर काढला जाईल. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना इलाज नसताना तात्काळ कांदा विकावा लागत आहे. त्यामुळेच आवक वाढली आहे. दरम्यान आवक जितकी जास्त तितकी किंमत कमी या नियमानुसार शेतकऱ्यांच्या या असहायतेचा गैरफायदा व्यापारी उचलत आहेत.

कांद्याला भाव किती?

महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सोलापूरचे नाव देखील आहे. येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून २५ जानेवारीला किमान १०० ते कमाल १७७५ रुपये आणि सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर २३ जानेवारीला भाव किमान भाव १०० रुपये ते कमाल २२०० रुपये आणि सरासरी ११०० रुपये प्रतिक्विंटल होता. त्याचप्रमाणे २० जानेवारीलाही किमान भाव १०० रुपयेच राहिला. मात्र, कमाल २३०० रुपये तर सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com