Onion Cultivation : खानदेशात कांदा लागवडीस वेग

Onion Farming : खानदेशात यंदा अतिपावसाने अनेक पिके हातची जात आहेत. अशात कांदा लागवडीची लगबगही सुरू आहे.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा अतिपावसाने अनेक पिके हातची जात आहेत. अशात कांदा लागवडीची लगबगही सुरू आहे. कांदा दर टिकून असल्याने अनेकांनी कांदा लागवडीचे नियोजन केले असून, लागवडीला मागील आठवड्यात गती आली. ही गती टिकून आहे. परंतु कांदा रोपांची टंचाई तयार झाली आहे.

कांदा लागवड यंदा आठ ते १० दिवस उशिरा सुरू झाली आहे. कारण या महिन्याच्या सुरुवातीला आठ ते १० दिवस पाऊस होता. अतिपावसात कांदा रोपे खराब होतील, लागवड यशस्वी होणार नाही, या भीतीने अनेकांनी लागवड टाळली. परंतु मागील १० ते ११ दिवस पाऊस कमी आहे. काही भागात पाऊस आला, पण काही भागात पाऊस नसल्याने कांदा लागवडीने गती घेतली.

Onion Farming
Onion Farming : अबब ! पठ्ठ्याने थेट पिकवला जगातील सगळ्यात मोठा कांदा

खानदेशात यंदा साडेसात हजार हेक्टरवर खरिपातील कांदालागवड अपेक्षित आहे. अतिपावसाने खरिपात हंगामी लागवड कमी होईल व लेट खरीप लागवड बऱ्यापैकी होईल, असाही अंदाज आहे. कारण या महिन्यातही अनेकांनी कांदा रोपवाटिका तयार केल्या आहेत. त्यातील रोपेही तरारली आहेत. कारण पाऊस कमी होता. या रोपांची पुनर्लागवड पुढील महिन्यात होईल.

परंतु सुरुवातीच्या दरांचा लाभ होईल या अपेक्षेने अनेक शेतकरी सध्या कांदा लागवड करीत आहेत. यात अनेकांच्या रोपवाटिका आहेत. परंतु काहींनी ऐनवेळी कांदा लागवडीचे नियोजन केल्याने रोपे खरेदी करावी लागत आहेत. खानदेशात धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारातील शहादा, नवापूर, नंदुरबार, नाशिकमधील सटाणा, मालेगाव, नांदगाव, चांदवड आदी भागात कांदा रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Onion Farming
Onion Cultivation : आळेफाटा परिसरात कांदा लागवड सुरू

कांदा रोपे खरेदीसाठी अनेक शेतकरी धुळे भागात जात आहेत. कारण या भागातील हलक्या, मध्यम जमिनीत रोपांची स्थिती चांगली होती. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, एरंडोल भागातील कांदा रोपवाटिकांचे सततच्या पावसात नुकसान झाले. अनेकांनी जुलैत रोपवाटिका तयार केल्या. पण जुलैतही सतत पाऊस व ढगाळ, प्रतिकूल वातावरण होते. यामुळे रोपांची तूट तयार झाली आहे. यामुळे लागवडीसाठी पुरेशी रोपेही काही शेतकऱ्यांकडे नाहीत.

सध्या धुळ्यात साक्री, धुळे, नंदुरबारीतल नंदुरबार, शहादा, नवापूर, जळगावातील यावल, चोपडा, भुसावळ, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव, पारोळा, जामनेर आदी भागात कांदा लागवड सुरू झाली आहे. लागवडीसाठी अनेकांनी जमिनीची पूर्वमशागतही मागील आठवड्यात उघपीड असताना केली. लागवड ठिबक, तुषार सिंचनाची व्यवस्था करून केली जात आहे. कारण पावसाचा खंड पडल्यास कांदा पिकाचे नुकसान होईल, अशीही भीती असते.

धुळ्यात सर्वाधिक साडेचार हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. यात साक्री तालुक्यात अधिकची लागवड होईल. जळगावातही सुमारे अडीच ते तीन हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे. जळगावात चोपडा, यावल, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, पारोळा आदी भागात कांदा लागवड होईल, असे संकेत आहेत.

एकरी चार हजारांपर्यंत खर्च

कांदा लागवडीसाठी अनेक गावांत कुशल मजुरांचे गटही तयार झाले आहेत. या समूह, गटांच्या मदतीने अनेक जण लागवड करून घेत आहेत. लागवडीसाठी एकरी चार हजार रुपयांपर्यंतचा खर्च येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com