Onion Market : कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा

Onion Rate : देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये कांद्याची मागणी कायम असल्याने गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर ३५०० रुपयांवर होते.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Nashik News : देशांतर्गत विविध बाजारपेठांमध्ये कांद्याची मागणी कायम असल्याने गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर ३५०० रुपयांवर होते. त्यात चढउतार दिसून आली. त्यातच शुक्रवारी (ता. १३) कांदा निर्यातीचे किमान निर्यातमूल्य रद्द होऊन निर्यात शुल्कात २० टक्के कपात झाल्याने दराला टेकू मिळाला आहे.

प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा झाल्याची दिसून आले. कांद्याच्या दरातील स्थिती मागणी व पुरवठ्यानुसार ठरते. मात्र केंद्राच्या हस्तक्षेपामुळे पुरवठ्यात अडचणी आल्या; गेल्या वर्षभरात त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागला. मात्र आता मागणीच्या तुलनेत पुरवठा नियंत्रित झाल्याने दरात सुधारणा आहे.

Onion
Soybean, Onion and Rice Update: निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका

त्यातच ग्राहकांची पसंती उन्हाळ कांद्याला असल्याने दर टिकून आहेत. एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री होत आहे. साठवलेला बहुतांशी कांदा हा बाजार विक्री झालेला आहे. त्यामुळे आता आवक कमी झाली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी होऊन जाते.

Onion
Onion Export Duty : केंद्र सरकारकडून कांदा निर्यात शुल्कातही २० टक्के कपात

त्यामुळे दराचा कल घेऊन साठवणूक केलेल्या कांद्याची शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्याने विक्री नियोजन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये लासलगाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणी काला जोरात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले.

दोन दिवसांतील दरस्थिती (दर प्रतिक्विंटल/रुपयांत)

बाजार समिती...१३ सप्टेंबर....१४ सप्टेंबर...झालेली वाढ

लासलगाव...४२००...४६००...४००

विंचूर लासलगाव...४१५०...४५५०...४००

पिंपळगाव बसवंत ४०५०...४४००...३५०

येवला ३९००...४४००...५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com