Onion Farming : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवड क्षेत्र वाढणार

Onion Cultivation : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने कांदा लागवड क्षेत्र वाढणार आहे.
Onion Farming
Onion FarmingAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली असल्याने कांदा लागवड क्षेत्र वाढणार आहे. आतापर्यंत खरीप, लेट खरिपाचा मिळून ६३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, नेवासा भागांत कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी अशा पद्धतीने कांद्याची लागवड होते. साधारण पावनेदोन लाख हेक्टरवर कांदा लावला जातो.

Onion Farming
Khandesh Onion Cultivation : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीची तयारी वेगात

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला पुरेसा दर मिळत नव्हता. त्यामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले. आर्थिक फटका बसला. तरीही शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाकडील कल कमी झाला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून कांदा दर बऱ्यापैकी मिळत आहे. यंदा पाणी उपलब्धतेची स्थिती चांगली आहे.

शिवाय कापसाची लागवड लवकर झालेली असल्याने कापसाचे क्षेत्र लवकर मोकळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा लागवड वाढणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. यंदा आतापर्यंत खरिपात ३६ हजार ३८१ हेक्टरवर व लेट खरिपात ५५ हजार लागवड झाली आहे. लेट २६ हजार ७७० हेक्टरवर लागवड झाली आहे.

Onion Farming
Onion Cultivation : रब्बी कांदा लागवडीसाठी रोपे निर्मितीची लगबग

सध्या लेट खरिपाच्याच लागवडी सुरू आहेत. यंदा खरीप व लेट खरिपात मिळून १ लाख १९ हजार तर रब्बीत एक लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. रब्बीच्या लागवडी अजून सुरू नाहीत. उन्हाळी लागवडीही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतची लागवड (हेक्टर)

अहिल्यानगर ७७१०

पारनेर १०,५९७

पाथर्डी ६५१०

कर्जत १०,९६८

जामखेड ४६६२

श्रीगोंदा ११,७१८

श्रीरामपूर ८४,

राहुरी ४७०८

नेवासा ५२४

शेवगाव ३८९

संगमनेर ४८०७

कोपरगाव २३०

अकोले २५

राहाता २१८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com