
Latur News : केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे. यात लातूर परिमंडळात १९ हजार ९५७ सौर कृषी पंपाची जोडणी देण्यात आली आहे.
सौर कृषी पंप बसविण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात आघाडी घेतली असून, त्याबद्दल नुकताच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत राज्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला. लातूर परिमंडलातील बीड जिल्ह्यात महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले व नवीन अर्ज असे एकूण १ लाख ३२ हजार ३१४ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी १५ हजार ३९१ शेतकऱ्यांनी लाभार्थी शुल्क भरलेले असून १४ हजार ७०५ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत.
तसेच लातूर जिल्ह्यात महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले व नवीन अर्ज असे एकूण १७ हजार ९६५ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी ३ हजार ४०३ शेतकऱ्यांनी लाभार्थी शुल्क भरलेले असून, १ हजार ९१० सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.
तर धाराशिव जिल्ह्यातील महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले व नवीन अर्ज असे एकूण ५१ हजार ६२६ अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी ७ हजार ७२६ शेतकऱ्यांनी लाभार्थी शुल्क भरलेले असून, ३ हजार ३४२ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारने राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दहा लाखांपेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार, असल्याचेही महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.