Akshaya Tritiya Seed Processing : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बीज प्रक्रियेला प्रारंभ, भात बियाणे खरेदी

Kharip Season : कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाचे उसाचे व भात व इतर पिकांचे धरून सुमारे तीन लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र आहे.
Seed Processing
Seed Processingagrowon

Akshay Ttritiya : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापूर जिल्ह्यात धूळवाफ भात पेरणीसाठी भात बियाणे खरेदी व बीज प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. पावसाळी खरीप हंगामात खताची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शासन कृषी विभागाच्या वतीने युरिया आणि डीएपी खताचा २२१९ टन खतांचा बफर स्टॉक करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे या कमिटीचे अध्यक्ष असून, खते व बियाणे यामध्ये बनावटगिरी होऊ नये, यासाठी १३ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात खरिपाचे उसाचे व भात व इतर पिकांचे धरून सुमारे तीन लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पावसाच्या तोंडावर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पन्हाळा व करवीर तालुक्यात धूळवाफ भात पेरणीला आज सुरुवात झाली आहे. दुपारी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला, आज पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्यात शेतीच्या कामाला उत्साह होता.

पावसाळी खरिपात खताची टंचाई टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे युरिया खताचे २०१९ टन व डीएपी खताचा २०० टन बफर स्टॉक करण्यात आला आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून मागणी असल्यास १५ ऑगस्टनंतर हे खत वितरित केले जाणार आहे.

खरिपात यंदा उसाचे एक लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र असून भात भुईमूग व इतर पिकाखाली एक लाख १९ हजार १९६ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये भारताचे ९५ हजार, भुईमुगाचे ३७ हजार, सोयाबीनचे बेचाळीस हजार व नाचणीचे १७ हजार हेक्टर क्षेत्र आहे.

Seed Processing
Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

भाताचे ४५८५ क्विंटल, तर सोयाबीनचे ६३० क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खतामध्ये युरिया ३२,८५९, डीएपी ४८७७, एमओपी ४९२५, सुपर फॉस्फेट ४२०२६, एस. एस. पी. ८७०२ टन खत उपलब्ध आहे.

यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण म्हणाले की, ‘खरीप हंगामासाठी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. १३ भरारी पथके तैनात आहेत. युरिया डीएपीचा बफर स्टॉक करण्यात आला आहे. खतांची दरवाढ झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com