Om Birla Speaker of the Lok Sabha : 'ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी; मोदी, राहुल गांधीकडून शुभेच्छा

Lok Sabha Speaker Election 2024 : ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राहुल गांधींनी बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या.
Om Birla Speaker of the Lok Sabha
Om Birla Speaker of the Lok SabhaAgrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा पहिल्यांदाच लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुक होत असल्याने नेमकं काय होतं याकडे देशाचे लक्ष लागले होते. दरम्यान महायुतीकडे बलाबल अधिक असल्याने ओम बिर्ला यांची बुधवारी (ता.२६) दुसऱ्यांदा लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्षांसाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला राजनाथ सिंह आणि लालन सिंह यांनी पाठिंबा दिला. बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसचे सदस्य कोडिकुनिल सुरेश होते. बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या.

बुधवारी लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. जी तब्बल ४५ वर्षानंतर म्हणजेच १९७६ पहिल्यांदाच निवडणूक लागली. याआधी स्वतंत्र भारतात, १९५२, १९६७ आणि १९७६ मध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी फक्त तीन वेळा निवडणुका पार पडल्या होत्या. तर १९५२ साली काँग्रेस सदस्य जी.व्ही. मावळंकर यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तर यंदा लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून एनडीए आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत एकमत न झाल्याने ही निवडणूक झाली. तर बिर्ला यांची निवड आवाजी मतदानाने झाली.

Om Birla Speaker of the Lok Sabha
Om Birla : लोकप्रतिनिधींच्या वर्तनामुळे चिंता

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. सभागृहाला संबोधित करताना मोदी म्हणाले, बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला. तुम्ही दुसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या जागेवर विराजमान होत आहात हे सभागृहाचे भाग्य आहे. माझ्यासह संपूर्ण सभागृहाकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. अमृत काळाच्या या महत्त्वाच्या क्षणी तुम्ही येथे आहात. दुसऱ्यांदा तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. येत्या ५ वर्षात तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन कराल असा विश्वास असल्याचेही मोदी म्हणाले.

दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदी राहुल गांधी यांची निवड इंडिया आघाडीने केली. यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी राहुल गांधी म्हणाले, विरोधकांना सरकारला सहकार्य करायचे आहे. सरकारकडे अधिक राजकीय शक्ती आहे. परंतु विरोधी पक्ष देखील भारताचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आमचा आवाज दाबणार नाही.

विरोधकांचा आवाज दाबणे हे लोकतांत्रिक नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पूर्ण मदत करू असे आश्वासन राहुल गांधी यांनी बिर्ला यांना दिले. तसेच बिर्ला यांच्यासह लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सभागृहातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी कोविड काळात प्रत्येक खासदाराची काळजी घेतल्याबद्दल आणि त्या काळात सभागृह चालवल्याबद्दल सभापती ओम बिर्ला यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले. तसेच सुळे म्हणाले, पाच वर्षांत खूप चांगले काम झाले, पण आमच्या १५० लोकांना निलंबित केले तेव्हा खूप वाईट वाटले. पण या पाच वर्षात किमान निलंबनाचा विचार करू नका.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com