Union Budget 2024 : ठोस अंमलबजावणी केली तरच तेलबिया आत्मनिर्भरता

Oilseed Sufficiency : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुलासारख्या तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
Oilseed
OilseedAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुलासारख्या तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण सरकारने केवळ घोषणेपुरते न थांबता प्रत्यक्षात या अभियानाची अंमलबजावणी करून त्यासाठी पुरेसा निधी दिला तरच फायदा होईल, असे मत शेतकरी आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले.

भारत सध्या खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. एकूण गरजेच्या तब्बल ६० टक्के खाद्यतेल देशाला आयात करावे लागते. त्यासाठी विदेश चलनही खर्च करावे लागते. चालू आर्थिक वर्षात खाद्यतेल आयातीवर १ लाख ४० हजार कोटी रुपये खर्च झाला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे सरकार मागील काही वर्षांपासून देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहे. उद्योगांनीही देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी योजना राबविण्याची मागणी रेटून धरली आहे.

Oilseed
Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा ; किसान सभेची टीका

गुरुवारी (ता. १) सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केली. मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफुलासारख्या तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेलात स्वावलंबी करण्याची योजना आहे.

त्यामध्ये अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्यासाठी संशोधन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, मार्केट लिंकेजेस, खरेदी, मूल्यवर्धन, पीकविमा आदी मुद्यांचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

Oilseed
Union Budget 2024 : पंतप्रधान आवास योजनेतून २ कोटी घरं बांधणार ; अर्थमंत्र्यांची घोषणा

परवडणार नाही, तोपर्यंत उत्पादन वाढणार नाही

अर्थमंत्र्यांनी घोषणा केली पण प्रत्यक्षात त्यांचेच सरकार निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन खाद्यतेल आयातीसाठी पायघड्या घालत आहे. आयात शुल्कात मोठी कपात केली. यामुळे सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा किमान ३०० ते ५०० रुपयांनी कमी आहेत.

यंदा दुष्काळ आहे. उत्पादनही घटले. तरीही शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. मोहरीलाही हमीभाव मिळत नाही. सूर्यफुलाचीही तीच गत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन परवडणार नाही, तोपर्यंत शेतकरी उत्पादन वाढवणार नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर तेलबिया अभियानाची घोषणा केल्याचे आम्ही स्वागत करतो. पण त्यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन पुरेशा आर्थिक तरतुदीची गरज आहे. आम्ही पुढील पाच वर्षांत भारताची खाद्यतेल आयात सध्याच्या ६० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारने या अभियानात खासगी उद्योगांनाही बरोबर घेतल्यास फायदा होईल.
- अजय झुनझुनवाला, अध्यक्ष, सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com