Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांना हरकती व निवेदन सादर

Goa Nagpur Highway : गोवा ते नागपूर शक्तीपीठ मार्ग हा आजरा तालुक्यातील सहा गावांमधून जाणे प्रस्तावित आहे.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Farmers Shaktipeeth Highway : गोवा ते नागपूर शक्तीपीठ मार्ग हा आजरा तालुक्यातील सहा गावांमधून जाणे प्रस्तावित आहे. शेळप, पारपोली, सुळेरान, खेडगे, दाभिळ वाडी, आंबाडे ही गावे शक्तिपीठ महामार्ग गेल्यास बाधीत होणार आहेत. या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांनी आज (ता.२२) अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन व सामुदायिक हरकती प्रांताधिकारी कारवे यांना देऊन आपला विरोध दर्शवला.

यावेळी गिरीश फोंडे म्हणाले, "आजरा तालुक्यातील जमिनी या बागायत आहेत. या रस्त्याच्या क्षेत्रामध्ये अनेक डोंगर आहेत शिवाय हिरण्यकेशी नदी वाहते. या महामार्गामुळे पर्यावरण व शेती दोन्ही उध्वस्त होणार आहेत. हा प्रस्तावित रस्ता जंगलातून जात असल्याने प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊन भविष्यात जंगली प्राणी हे गावच्या वस्तींमध्ये व शेतात येऊन मनुष्यहानी होणार आहे.

हा रस्ता कोणीही शेतकरी व सामान्य नागरिकांनी मागणी न करता केवळ भांडवलदारांच्या हितासाठी सरकार शेतकऱ्यांच्यावर लादत आहे. सध्या गोवा नागपूर यासाठी महामार्ग अस्तित्वात असताना दुसरा कशासाठी? " असा सवाल उपस्थित करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी म्हणाल्या, "आमच्याकडे केवळ गॅझेट नोटिफिकेशन व हरकतींचे परिपत्रक आले आहे या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्याही सूचना महाराष्ट्र शासनाकडून अजून देखील मिळालेल्या नाहीत." शेतकऱ्यांच्या हरकती शासनापर्यंत आम्ही पोहोचू असे आश्वासन त्यांनी दिले.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार

यावेळी सुधाकर पाटील, प्रकाश शेटगे, गोविंद पाटील, बाळासाहेब पाटील, श्रावण वाझे, कविता नवार,तानाजी पाटील, प्रकाश कांबळे, नारायण गुंजार, प्रवीण नार्वेकर, निवृत्ती कांबळे,महादेव कांबळे, वसला नवार,अंजना कांबळे यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शक्तिपीठ महामार्गाचे गॅझेट नोटिफिकेशन अर्थात महामार्गाचा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा आजरा तहसीलवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com