CM Oath Ceremony : शपथविधी ठरला, मुख्यमंत्रिपद गुलदस्तातच

Maharashtra Government Formation : गुरुवारी (ता. ५) शपथविधी होणार असला आणि गटनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर केलेले नाही.
Mahayuti
MahayutiAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजपने काँग्रेसचा कित्ता गिरवत मुख्यमंत्रिपदावरून प्रचंड गोपनीयता पाळली आहे. गुरुवारी (ता. ५) शपथविधी होणार असला आणि गटनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर केलेले नाही.

मंत्रिमंडळासह अन्य नावांवर चर्चा करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे दिल्लीवारी करणार असल्याचे समजते. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारच्या (ता. २) दिवसभरातील बैठका आणि कार्यक्रम रद्द करून त्यांनी विश्रांती घेणे पसंत केले. शिंदे यांच्या आजारपणामुळे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) आमदारांत अस्वस्थता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर माहिती देत सरकारचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानावर होणार आहे, असे जाहीर केले. या सोहळ्याची जय्यत तयारी भाजप करत आहे. सोमवारी प्रदेशाध्यक्ष बावणकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह श्रीकांत भारतीय, मोहित कांबोज या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.

Mahayuti
Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरून उद्या पडदा उठणार?; भाजपचे निरीक्षक राज्याच्या दौऱ्यावर

गृहमंत्रिपदावर अडून बसलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाला न जुमानता भाजपने एकतर्फी तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर ते मंत्रिमंडळात जाण्यास फारसे इच्छुक नाहीत. मात्र त्यांच्या गटाच्या नेत्यांनी शिंदे यांच्यावर प्रचंड दबाव आणला आहे. पक्ष एकत्र ठेवायचा असेल तर सरकारमध्ये राहणे योग्य असल्याचे सांगितले आहे. शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने तसेच ते त्यांच्या मूळगावी गेल्याने आमदारांचा संपर्क होत नाही.

मंत्रिमंडळ शपथविधीला दोन दिवसांचा कालावधी उरल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजपच्या आमदारांनी ‘सागर’ या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांनी अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर हजेरी लावली. भाजपच्या देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे या महिला आमदारांनी फडणवीस यांची भेट घेतली. तर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य आमदारांनी अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

निरीक्षक नेमले पण बैठकीची तारीख नाही

भाजपने गटनेता निवडीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सोमवारी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. मात्र, गटनेता निवडीच्या बैठकीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. ही बैठक मंगळवारी (ता. ३) किंवा बुधवारी होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली आहे. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून ‘सागर’ या त्यांच्या निवासस्थानी आमदारांनी हजेरी लावत मंत्रिमंडळातील समावेशाबाबत चर्चा सुरू केली आहे.

Mahayuti
Maharashtra Politics : महायुतीच्या गोंधळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

गुरुवारी सायंकाळी शपथविधी

राज्यपालांनी जाहीर करण्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी समाज माध्यमावर माहिती देऊन गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ५ वाजता शपथविधी होणार असल्याचे जाहीर केले. यावरून विरोधी पक्षांनी टीका केली असली तरी भाजपने शपथविधीची जय्यत तयारी केली आहे.

सोमवारी आझाद मैदानाची पाहणी केली असून भाजप प्रदेश कार्यालयात आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेकाली तयारीची बैठक घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच संतांनाही बोलविण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्रिपदाबाबतच्या बातम्या निराधार : श्रीकांत शिंदे

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे सरकारबाहेर राहून श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार अशा वदंता होत्या. मात्र, त्याला श्रीकांत शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. ‘महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली.

त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्रिपदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा स्पष्ट करतो.’ असे सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याची विनंती केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com