Pik Vima : तांत्रिक अडचणींमुळे ९९ हजार शेतकऱ्यांची विमा नोंद बाकी

Crop loan : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत (पीएमएफबीवाय) चंद्रपूर जिल्हा बॅंकेने एक रुपयांप्रमाणे ९९ हजार ८०० रुपये जमा केले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पीएमएफबीवाय पोर्टलवर याची नोंदणीच करता आली नाही.
pik vima
pik vima Agrowon

Chandrapur News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत (पीएमएफबीवाय) जिल्हा बॅंकेने एक रुपयांप्रमाणे ९९ हजार ८०० रुपये जमा केले. मात्र तांत्रिक अडचणीमुळे पीएमएफबीवाय पोर्टलवर याची नोंदणीच करता आली नाही. परिणामी हे ९९ हजार ८०० शेतकरी विम्यासाठी पात्र ठरणार किवा नाही, याविषयी साशंकता व्यक्‍त होत आहे.

pik vima
E Peek Pahani : पिक विमा मिळवायची असल्यास आपली ई-पीक पाहणी करून घ्या ; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात धानासोबतच कपाशी, सोयाबीन यांसारखे पीक घेतले जाते. यंदा पीक संरक्षित व्हावे तसेच पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याकरिता अवघ्या एक रुपयात योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला या योजनेला शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद नसला तरी शेवटच्या टप्प्यात जागृतीमुळे शेतकरी सहभाग वाढला.

pik vima
Crop Insurance : विमा संरक्षण कालावधी संपल्यावर पीक पडताळणी ; कृषी विभागाचा उफराटा कारभार

केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. चंद्रपूर जिल्हा बॅंकेने प्रती अर्ज एक रुपयाप्रमाणे ९९ हजार ८०० रुपये जमा केले. विमा हप्ता भरणा शेतकऱ्यांची नोंदणी पीएमएफबीवाय पोर्टलवर करणे बंधनकारक होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे दरदिवशी केवळ १० ते १५ शेतकऱ्यांचीच नोंदणी करणे शक्‍य झाले. अशातच नोंदणीची मुदत १९ ऑगस्ट रोजी संपली. त्यामुळे तब्बल ९९ हजार ८०० शेतकऱ्यांच्या नोंदणी आणि विमा संरक्षणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. या प्रकाराची दखल घेत जिल्हा बॅंकेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांना पत्र लिहून नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी देखील यास दुजोरा दिला.

चेंडू केंद्रीय कृषी आयुक्‍तांच्या कोर्टात

नोंदणीच्या मुदतवाढीची जिल्हा बॅंकेच्या पत्राची दखल घेत शंकर तोटावार यांनी राज्याच्या कृषी आयुक्‍तांना ही बाब कळविली. आयुक्‍तालयाने केंद्रीय कृषी आयुक्‍त कामना शर्मा यांना पत्र पाठवून ९९ हजार ८०० शेतकऱ्यांच्या नोंदणीला मुदतवाढीची मागणी केली. त्यामुळे केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com