Team Agrowon
या वर्षी लांबलेल्या पावसामुळे मार्च महिन्यात बाजारात येणारा पांढरा कांदा एप्रिलमध्ये बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या पांढऱ्या कांद्याच्या एका माळेला १०० ते १८० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदा लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांदा उशिरा बाजारात आला आहे.
कांद्याच्या एका माळेचे वजन हे त्याच्या आकारमानानुसार अडीच ते चार किलोपर्यंत असते. एका माळेमध्ये ३० ते ३५ कांदे असतात.
सुरुवातीलाच एका माळेला १०० ते १८० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादकांना फायदा होत आहे.
सफेद कांद्याचे वैशिष्ट्य हे की हा कांदा कोथिंबीरीप्रमाणे जेवताना कच्चाच खाल्ला जातो. हा कांदा चवीला लाल कांद्याप्रमाणे उग्र नसून काहीसा गोड असतो. हा जेवताना सॅलेड प्रमाणे वापरला जातो.