Water Scarcity : नाशिक विभागात साडेबाराशे गावे-वाड्या तहानलेल्या

Nasik Water Crisis : गेल्या तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानाच्या पाऱ्यात घट झाली असली, तरी दुष्काळाचा दाह कायम आहे.
Tanker Water Supply
Tanker Water SupplyAgrowon
Published on
Updated on

Nahik News : गेल्या तीन दिवसांत उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानाच्या पाऱ्यात घट झाली असली, तरी दुष्काळाचा दाह कायम आहे. विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांतील एक हजार २४७ गावे-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या सर्व ठिकाणी २८६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल पाच लाख ७० हजार ६७९ लोकसंख्येची तहान भागत आहे.

चालू वर्षी उन्हाची दाहकता अधिक आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच पारा चाळिशी पार पोहोचला होता. वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत धरणांच्या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. गावागावांमधील पाणवठेदेखील कोरडेठाक पडले आहेत. परिणामी दुष्काळाचा दाह अधिक चिंताजनक बनला आहे.

Tanker Water Supply
Water Scarcity : जालना जिल्ह्यात टँकरची ‘सेंच्युरी’

अशा वेळी हंडाभर पाण्यासाठी जनतेला रोजगार बडवून तासन् तास टँकरची प्रतीक्षा करणे नशिबी आले आहे. विभागात अहिल्यानगरला टंचाईच्या सर्वांत जास्त झळा बसत आहेत. जिल्ह्यातील ८०२ गावे-वाड्यांना १४५ टँकरच्या सहाय्याने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात १२७ टँकरचा फेरा सुरू आहे. या टँकरद्वारे ४३३ गावे-वाड्यांची तहान भागविली जात आहे.

जळगावला १२ गावे-वाड्यांसाठी १४ टँकर धावताहेत. सुदैवाने गेल्या वर्षीप्रमाणे धुळे व नंदुरबार हे दोन्ही जिल्हे टँकरमुक्त आहेत. दरम्यान, विभागात तूर्तास अवकाळीने उन्ह्याच्या तडाख्यात घट झाली आहे. पण मॉन्सूनच्या आगमनासाठी अद्यापही महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात उन्हाचा तडाखा पुन्हा एकदा वाढेल, असा अंदाज आहे. परिणामी टँकरच्या फेऱ्यातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Tanker Water Supply
Marathwada Water Scarcity : मराठवाड्यात पाणीटंचाई गंभीर ; टँकरची संख्या ४३५ वर

१६४ विहिरी अधिग्रहीत

विभागात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी १६४ विहिरी अधिग्रहीत केलेल्या आहेत. त्यामध्ये ६४ विहिरी गावांसाठी असून, उर्वरित शंभर विहिरींमधून टँकर भरले जातात. नाशिक जिल्ह्यात ६७ विहिरी प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. जळगाव व अहिल्यानगरला अनुक्रमे ४६ आणि ५१ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. विभागातील बाकीच्या दोन्ही जिल्ह्यांत टँकरप्रमाणेच विहिरी अधिग्रहणाची गरज भासलेली नाही.

पाण्याची उपलब्धता

विभागात ५३७ धरणात २,१०८ दलघमी साठा

उपलब्ध साठ्याचे प्रमाण ३५.५१ टक्के

नाशिक जिल्ह्यातील धरणांत २९.७१ टक्के पाणी

गंगापूर धरणात केवळ ४५ टक्के पाणी शिल्लक

टँकरची स्थिती

जिल्हा गावे संख्या

अहिल्यानगर ८०२ १४५

नाशिक ४३३ १२७

जळगाव १२ १४

धुळे ०० ००

नंदुरबार ०० ००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com