Protest For Water : कुसमाडीत पाण्यासाठी शोले स्टाइल आंदोलन

Water Crisis : पाच दिवसांपासून कुसमाडी येथे ग्रामस्थांना नळाचे पाणी मिळालेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी (ता. २) गावातील पाण्याच्या टाकीवर चढून सुमारे दोन तास ‘शोले’ स्टाइल आंदोलन केले.
Protest For Water
Protest For Water Agrowon
Published on
Updated on

Nashik News : पाच दिवसांपासून कुसमाडी येथे ग्रामस्थांना नळाचे पाणी मिळालेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रविवारी (ता. २) गावातील पाण्याच्या टाकीवर चढून सुमारे दोन तास ‘शोले’ स्टाइल आंदोलन केले. दोन तासांनी पाणी सोडल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन अखेर मागे घेतले.

ग्रामपंचायतीने पाणीपट्टीत वाढ केल्याचा प्रामस्थांचा आरोप आहे, तर गावात मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी थकल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. कुसमाडी गावाची लोकसंख्या २,५०० असून, गावात १,००० आसपास लोक राहतात. सुमारे ६५ कुटुंबाकडे नळजोडणी असून, १७ कुटुंबाकडे पाणीपट्टी थकित आहे.

गावात ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना आणि ग्रामपंचायतीची स्वमालकीची नायगव्हान नळ पाणीपुरवठा योजना, अशा दोन पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केला जातो. सप्टेंबरपर्यंत नायगव्हाण पाणीपुरवठा योजनेला पाणी नसल्याने ग्रामपंचायतीने ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी घेत गावाला पाणीपुरवठा केला होता.

Protest For Water
Water Crisis : कवठेमहांकाळामधील अकरा तलाव कोरडे, म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी

रविवारी पाणी पुरवठ्याचा दिवस होता. नायगव्हाण पाणीपुरवठा योजनेचे पाणी ग्रामपंचायत सध्या घेत असून, पाणीपट्टी थकित असल्याने ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा केला नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सकाळी साडेनऊला रिकामे हंडे घेऊन पाणी टाकीवर जात आंदोलन केले.

सुमारे दोन तास आंदोलन चालल्यानंतर प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या दिवसानंतरही पाणीपुरवठा न केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पाणीपट्टी वाढविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे, तर ग्रामपंचायत प्रशासन थकित पाणीपट्टी वसुलीच्या प्रयत्नात आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी बारहाते यांनी पाणी सोडल्यानंतर ग्रामस्थ टाकीवरून दोन तासानंतर खाली आले.

Protest For Water
Water Crisis : वसई-विरारमधील गावे पाण्यावाचून तहानलेली

अशी झाली पाणीपट्टी वाढ

कुसमाडी ग्रामपंचायतीने ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना आणि नायगव्हाण पाणीपुरवठा योजना, अशा दोन्ही योजना मिळून ६५ नळधारकांना गेल्या वर्षापूर्वी १८०० रुपये प्रत्येकी पाणीपट्टी एका नळधारकाला आकारण्यात येत होती.

ग्रामपंचावत प्रशासनाने वर्षापूर्वी नळधारकांच्या नळजोडण्यांना मीटर बसवत पाणीपट्टी १,००० लिटर पाण्याला ३५ रुपये आकारायला सुरुवात केली. या आकारणीमुळे काही नळधारकांमध्ये संतापाची भावना असून, पाणीपट्टी थकित आहे. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकमत नसून गटबाजीचे राजकारण आहे.

गावात दोन ठिकाणी व्हॉल्वमध्ये गळती झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यात काही युवकांनी टाकीवर जात आंदोलन केले.
- राणी बारहाते, सरपंच, कुसमाडी
गावाला दोन पाणी योजनांचा पाणीपुरवठा केला जातो. आता नळजोडण्यांना मीटर बसवले आहेत. नायगव्हाण योजनेच्या पाणीपुरवठ्याचे वीजबिल मागील वर्षी सुमारे सव्वा लाखाच्या आसपास आले आणि पाणीपट्टी एक लाख जमा झाली. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत.
- प्रदीप बोडखे, ग्रामसेवक, कुसमाडी
ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणीपट्टी १८०० रुपये आहे. ती येवला शहरातील नळधारकांनाही नाही. आता मीटर बसवून हजार लिटर पाण्याला ३५ रुपये ग्रामपंचायत आकारत आहे. ही मनमानी नाही तर काय आहे.
- भास्कर येवले, माजी सदस्य, कुसमाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com