Agri Input Sample : कृषी खात्याकडे निविष्ठा नमुन्यांचे थकले १८ कोटी रुपये

Agriculture Department : वर्षभर गुणनियंत्रणाच्या नावाखाली कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रातून नमुने घेतले जातात. त्यापोटी बिल घेत त्यानंतर रीतसर धनादेशाच्या माध्यमातून त्याचा परतावा देखील केला जातो.
Agriculture Inputs
Agriculture InputsAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : वर्षभर गुणनियंत्रणाच्या नावाखाली कृषी विभागाकडून कृषी सेवा केंद्रातून नमुने घेतले जातात. त्यापोटी बिल घेत त्यानंतर रीतसर धनादेशाच्या माध्यमातून त्याचा परतावा देखील केला जातो. मात्र २००२ पासून ही रक्‍कम मिळालीच नसल्यामुळे कृषी व्यावसायिकांमध्ये असंतोष व्यक्‍त केला जात आहे.

कृषी केंद्रातून विकल्या जाणाऱ्या निविष्ठांचा दर्जा राखला जावा या उद्देशाने गुण नियंत्रकांमार्फत त्याची सातत्याने तपासणी केली जाते. बियाणे, खतांसह इतर निविष्ठांचे नमुने घेत ते लॉट नंबरनुसार प्रयोगशाळांमध्ये तपासणीकामी पाठविण्यात येतात. यापूर्वी अमर्याद नमुने घेण्याची मुभा कृषी खात्याच्या गुणनियंत्रकांना होती.

Agriculture Inputs
Agriculture Input : बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीवेळी काळजी घ्या

मात्र यात कृषी सेवा केंद्र व्यावसायिकांचे शोषण होत होते. नमुन्याआड मोठ्या प्रमाणावर निविष्ठा घेतल्या जात होत्या. या संदर्भाने वाढत्या तक्रारींची दखल घेत निविष्ठा नमुने घेण्याच्या पद्धतीत आणि ते किती घ्यावे याबाबतही धोरण निश्‍चीत करण्यात आले. त्यानुसार आता वर्षभरात बियाणे सात, खत पाच आणि कीटकनाशकांचे तीन याप्रमाणे नमुने घेण्याची तरतूद आहे.

Agriculture Inputs
Agricultural Input License: कृषी निविष्ठा परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मात्र अपवादात्मकस्थितीत काही शंका किंवा तक्रारी असल्यास त्यापेक्षा अधिक नमुने घेता येतात, असेही कायद्यात नमूद करण्यात आले आहे. कृषी सेवा केंद्रातून घेतलेल्या निविष्ठा नमुन्यांचे रीतसर बिल घेत नंतर शासनाकडून पैसे आल्यास व्यावसायिकांना याचा परतावा केला जातो.

त्याकरिता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी लागते. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी व्यावसायिकांना ही रक्‍कम नियमित मिळत होती.

बिल घेतल्यानंतर कृषी विभागाकडून धनादेशाद्वारे परतावा दिला जात होता. परंतु २००२ पासून हा परतावा मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आजवर सुमारे १८ ते २० कोटी रुपये कृश खात्याकडे थकले आहेत. ही रक्‍कम मिळावी यासाठी आमचा संघटनात्मकस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, सीडस, पेस्टिसाइड डीलर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com