Irrigation Management : गाळ काढण्यासाठी निती आयोगाचे पाठबळ

Washim Irrigation Update : वाशीम जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते.
Irrigation Management
Irrigation ManagementAgrowon
Published on
Updated on

Irrigation Washim News : वाशीम जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. जिल्ह्यात सिंचनाच्या व्यवस्थेसाठी असलेल्या सिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली. हे लक्षात घेता नीती आयोगाच्या माध्यमातून १० हेक्टर क्षमतेच्या तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

आतापर्यंत १२ तलावांतून दोन लाख ९० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. ६७ तलावांतून सहा लाख ६७ हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असून हे काम जोमाने सुरू आहे.

तलावातून गाळ काढण्याच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी उपलब्ध होत आहे. शेतात गाळ टाकल्याने शेतातील पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ज्या तलावातून गाळ काढण्यात येणार आहे, त्या तलावाची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे.

सोबतच त्या तलाव परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने येथील मागासलेपण ओळखून जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे. मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतीची उत्पादन क्षमता वाढावी तसेच विविध प्रकारची जलसंधारणाची कामे जिल्ह्यात व्हावी. यासाठी नीती आयोग आग्रही आहे.

Irrigation Management
Tembhu Upsa Irrigation Project : ‘टेंभू’च्या बंदिस्त पाईपलाईनची कामे पूर्णत्वास

कृषी व जलसंधारण क्षेत्रात मागील वर्षी जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन या वर्षी सुद्धा नीती आयोगाने जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

जिल्ह्यात १० हेक्टरपर्यंतच्या तलावातील गाळ काढण्यात येत आहे. जलसंधारण विभागाने ६७ तलावांतून सहा लाख ६७ हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन केले आहे.

१२ तलावांमध्ये रिसोड तालुक्यातील कोयाळी, वाशीम तालुक्यातील किनखेड, झोडगा, पांगरखेडा, कृष्णा, कारंजा तालुक्यांतील कामरगाव, सोमनाथनगर, मालेगाव तालुक्यातील उडी व अमानी आणि मंगरूळपीर तालुक्यातील चिखलगड, वनोजा व बेलखेड येथील तलावांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३८ तलावांतून गाळ काढण्याचे काम जोमाने सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com