Teachers Constituency : शिक्षक मतदार संघात नववी पास, शेतमजूर मतदार

Election Update : नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता शिगेला पोहोचली आहे. प्रमुख उमेदवारांचा प्रचार जोरात आहे.
Election 2024
Election 2024 Agrowon

Nashik News : नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता शिगेला पोहोचली आहे. प्रमुख उमेदवारांचा प्रचार जोरात आहे. या पार्श्‍वभूमीवर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आमदार किशोर दराडे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. या निवडणुकीच्या मतदार यादीत ठिकाणी १९ वर्षे वय असलेले, नववी पास, शेतमजूर, मेडिकल दुकानदार, हमाल, कापड दुकान, पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणारे कामगार असे लोक मतदार झाल्याचे आढळले आहे. यातील बहुतांशी गैरप्रकार विद्यमान आमदारांच्या संस्थेची संबंधित असल्याचा आरोप केला आहे.

अपक्ष उमेदवार कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद केला. पुढे बोलताना कोल्हे म्हणाले, की हा मतदार संघ ५४ तालुक्यांचा आणि ७० हजार मतदारांचा आहे. त्यात अनेक शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. विविध संस्थांनी देखील आम्हाला सहकार्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही उमेदवारांची स्थिती अतिशय अवघड झाली आहे.

Election 2024
Europe Agriculture : युरोपातील बदलती शेती अन्‌ उद्योग क्षेत्र

हे उमेदवार सध्या गैरप्रकार करण्याला प्राधान्य देत आहेत. प्रचारादरम्यान मतदार यादीतील अनेक शिक्षकांचा पत्ताच लागला नाही. आता गैरशिक्षक मतदान करणार नाही. याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्याबाबत ते काय कार्यवाही करतात याकडे आमचे लक्ष असेल. असे मतदान झाल्यास ते वेबकॅम वर होणार आहे. त्यामुळे बोगस मतदान करणाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू.

कोल्हे यांनी दराडे यांच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. गैरप्रकार करणारे आणि गुन्हे दाखल असलेल्या व्यक्ती शिक्षकांचे प्रतिनिधी कसे होऊ शकतात? हा शिक्षकांवर अन्याय आहे. तो आम्ही होऊ देणार नाही. बोगस मतदारासंबंधी निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या बनावट मतदारांनी मतदान करू नये. अन्यथा, त्यांना नाहक एक वर्षापर्यंत शिक्षा भोगावी लागू शकते.

Election 2024
Agriculture Export Ban : एकवेळ किसान सन्मान निधी परत घ्या, पण निर्यातबंदी उठवा !

स्कॉलरशिपमध्ये मोठा घोटाळा?

लोकप्रतिनिधींनी स्कॉलरशिपमध्ये मोठा घोटाळा केला आहे. खोटे वारस दाखवून स्वतःच्याच कर्जखात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली, ही बाब शिक्षकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे शिक्षकांनीच आता ही निवडणूक हातात घेतली.

तीन जिल्ह्यांतील प्रमुख शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. युती आणि आघाडीत असंतोष असून, कोणतेही सामंजस्य नाही, हे मतदारांना कळून चुकल्याने मतदार माझ्या मागे ठाम उभे आहेत. शिक्षकांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक लढवत असल्याने सर्वत्र मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा कोल्हे यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com