PM Kisan New Rule : ‘पीएम किसान’साठी नवीन नियम

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वारसा हक्क वगळता सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
PM Kisan Scheme
PM Kisan SchemeAgrowon
Published on: 
Updated on: 

Sangli News : पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये वारसा हक्क वगळता सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, आता ‘पीएम किसान’साठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे.

PM Kisan Scheme
PM Kisan New Rule : पीएम किसान, नमो सन्मानसाठी नवी नियमावली; काय आहे नियमावलीत?

केंद्राने सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जातात. आता राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळत आहेत. या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला अथवा अठरा वर्षांवरील मुलांना लाभ घेता येतो.

PM Kisan Scheme
PM Kisan Scheme : चिपळूण तालुक्यात ‘पीएम किसान, नमो सन्मान’चे १८०० शेतकऱ्यांचे अर्ज रद्द

उताऱ्यावर २०१९ पूर्वी नोंद असेल अथवा वारसा हक्काने नाव नोंद असेल तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेत लाभ घेण्यासाठी पती-पत्नी व मुलगा, २०१९ नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरवाशिणीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हींकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आहे.

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी शेतकऱ्याचा नवीन ७/१२ उतारा, शेतकऱ्याचा आठ अ उतारा, लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड, लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार, विहित नमुना अर्ज, शिधापत्रिका यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com