Tuti Lagwad: परभणी जिल्ह्यात नवीन तुतीची ११३ एकरांवर लागवड

विविध कारणांनी पारंपरिक पीक पद्धतीपासून उत्पादन आणि उत्पन्नाची हमी राहिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकरी तुलनेने शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या कृषिपूरक रेशीम कोष उद्योगाकडे वळले आहेत.
Tuti Lagwad
Tuti LagwadAgrowon
Published on
Updated on

परभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदा १११ शेतकऱ्यांनी ११३ एकरांवर नवीन तुती लागवड (Mulberry Cultivation) केली आहे. एकूण ४६८ शेतकऱ्यांकडील ५०५ एकरांवरील जुनी तुती लागवड आहे.

नवी-जुनी मिळून एकूण ५७९ शेतकऱ्यांकडे ६१८ एकरांवर तुती लागवड आहे. चालू आर्थिक वर्षांत डिसेंबरअखेर पर्यंत ९५.६८२ टन रेशीम कोष उत्पादन (Silk Cocoon Production) मिळाले,’’ अशी माहिती जिल्हा रेशीम कार्यालयातील सूत्रांनी दिली.

Tuti Lagwad
Mulberry Cultivation : मराठवाड्यात २००० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट

विविध कारणांनी पारंपरिक पीक पद्धतीपासून उत्पादन आणि उत्पन्नाची हमी राहिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकरी तुलनेने शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या कृषिपूरक रेशीम कोष उद्योगाकडे वळले आहेत.

जिल्ह्यातील ३२३ शेतकऱ्यांकडील २७५ एकरांवरील तुती लागवड बाद झाल्यानंतर एकूण ४६८ शेतकऱ्यांकडे ५०५ एकरांवर जुनी तुती लागवड राहिली आहे.

Tuti Lagwad
Mulberry Cultivation : तुतीची लागवड करून रेशीम शेती करावी

चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात २२५ एकरांवर नवीन तुती लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. डिसेंबर अखेरपर्यंत १११ शेतकऱ्यांनी ११३ एकरांवर नवीन तुती लागवड केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ५७९ शेतकऱ्यांकडे ६१८ एकरांवर तुती लागवड आहे.

चालू आर्थिक वर्षांत डिसेंबर अखेरपर्यंत जुन्या आणि नव्या शेतकऱ्यांना १ लाख ४९ हजार ७५० अंडीपुंजाचा पुरवठा करण्यात आला. त्यापासून एकूण ९२.८६२ टन रेशीम कोष उत्पादन मिळाले आहे.

परभणी जिल्ह्यातील जुनी-नवीन तुती क्षेत्र स्थिती (एकरांमध्ये)

तालुका जुनी नवीन एकूण

  • परभणी ३२ ५ ३७

  • जिंतूर ३८ १८ ५६

  • सेलू ४८ -- ४८

  • मानवत १४३ २८ १७१

  • पाथरी १६ ४ २०

  • सोनपेठ २८ ३ ३१

  • गंगाखेड ९२ १९ १११

  • पालम ९ -- ९

  • पूर्णा ९९ ३६ १३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com