Vidarbha Development : पूर्व विदर्भाचे नवीन विकास मॉडेल- नाना पटोले

Nana Patole : सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात सामान्य लोकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत आणि समाजातील हीच अवस्था नाना पटोलेंना पाहवली नाही.
Vidarbha Development
Vidarbha DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Maharashtra East Vidharbha Development : जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात आपल्या रोजच्या आयुष्यातल्या समस्या सोडवण्यासाठी, देशासमोरच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आपण सरकार निवडून देतो. पण सध्या भारताची प्रगती नाही तर अधोगती होताना दिसतेय. आपली अर्थव्यवस्था ढासळली आहे, निरनिराळे प्रकल्प बंद पडताना दिसत आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे. सध्या सत्तेत असलेले सरकार, सामान्य लोकांसाठी नाही तर मूठभर भांडवलदारांच्या प्रगतीसाठी करते आहे. त्यांच्या कारकीर्दीत समाजात प्रचंड विषमताही पसरलेली आहे. श्रीमंतांना जास्त श्रीमंत आणि गरीबांना जास्त गरीब करण्याचे काम या सरकारने केले आहे.

या परिस्थितीत बदल व्हायला हवा ही इथल्या प्रत्येक माणसाची, नागरिकाची इच्छा आहे. तीच इच्छा उराशी बाळगून मनापासून आणि प्रामाणिक प्रयत्न करणारे पूर्व विदर्भातील नेते म्हणजे नाना पटोले. नानांना लहानपणापासूनच समाजकार्यच करावे अशी इच्छा होती. मुळात त्यांचा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला. त्यामुळे शेतकरी समाजाच्या, गरीब जनतेच्या वेदना ते अधिक जवळून जाणतात. सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात सामान्य लोकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत आणि समाजातील हीच अवस्था नाना पटोलेंना पाहवली नाही.

Vidarbha Development
Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

त्यामुळे त्यांनी स्वतःच राजकारणात येऊन हे संपूर्ण चित्र बदलायचे ठरवले आणि स्वतःच्या गावातूनच विकासकार्याची व समाजकार्याची मुहूर्तमेढ रोवली. अनेक वर्षांपासून नानांनी विदर्भात अनेक विकास कामे केलेली आहेत. त्यांनी विदर्भात केल्याला कामांची पोचपावती पाहायचीच असेल तर तेथील स्थानिक लोकांच्या चेहऱ्यावर आलेले स्मितहास्य पाहायला हवे.

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशाचा संपूर्ण कारभार सांभाळण्याची जबाबदारी स्वतंत्र भारतीयांच्या हाती आली. स्वतंत्र भारताचे नवीन सरकार स्थापन झाले. आपण काँग्रेसच्या मजबूत राजवटीखाली प्रगती करू लागलो. हळू हळू विकासाची रेल्वे रूळावर आली. रस्ते बनले. वाहने धावू लागली. तरीही पूर्व विदर्भातील एका गावात बस सेवा सुरू झाली नव्हती. पूर्व विदर्भातील शंकरपूर हे त्या गावाचे नाव. तिथल्या स्थानिकांनी नाना पटोलेंना मदतीची हाक दिली. नानांनीही त्यांच्या हाकेला ओ देऊन त्वरित बससेवा सुरू करून त्यांची समस्या सोडवली. आज त्या गावातील लोक आनंदाने बस सेवेचा लाभ घेत आहेत.

Vidarbha Development
Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

त्याचबरोबर आपण एका शहरापासून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या पुलाचे भरभरून कौतुक ऐकतो. पण गावागावांना जोडणाऱ्या पूल बांधकामासंदर्भात कोणी ब्र सुद्धा काढत नाहीत. नाना पटोले यांनी त्यांच्या जिल्ह्यात दळणवळणाची सोय गावातील लोकांना उपलब्ध व्हावी म्हणून लवारी व चुलबंद नदीवर पुल बांधून तिथल्या शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, महिलांचा प्रवास सुखकर करून दिला. पूर्वी लोकांना नदी ओलांडण्यासाठी नदीत उतरावे लागत असे. ते पावसाळ्यात होडीने प्रवास करत आणि रस्त्याने जायचे झाल्यास त्यांना २० किमी जास्तीचे अंतर पार करून जावे लागत होते. पण आता या पुलाच्या बांधकामानंतर तेच अंतर ५ किमी झाले. त्यामुळे गावातील लोकांचा त्रास कमी झाला, इंधन आणि वेळ दोन्हीची बचत होऊ लागली. पूल बांधल्यामुळे आता गावातून बससेवादेखील सुरू करण्यात आली आहे आणि हे नाना पटोलेंमुळे शक्य झाले.

ते राजकारणात आल्यापासून त्यांनी पूर्व विदर्भाचा कायापालट केलाय. त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रचंड काम केले आहे. शेतकाऱ्यांना जास्त बोनस मिळवून देणे असो, त्यांच्या हक्काच्या जमिनीसाठी आंदोलन करणे असो, त्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळवून देणे असो अशा अनेक गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दुर्गाबाई डोहाचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेक गावांमधल्या शेतांमधून पाणी खेळू लागले. तसेच त्यांनी चुलबंद नदीवर पाण्याचे हौद बांधून दिले.

नाना पटोले स्वतः शेतकरी असल्याने शेती झाल्यावर धान्याची साठवणूक करून ठेवणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असते हे त्यांना हे पक्के माहीत आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बारा धान्याचे गोदाम सुरू करून देण्याचे काम हाती घेतले. शेतकऱ्यांना धान्यसाठा सुरक्षित ठेवणे शक्य झाले.

'आरोग्यम धनसंपदा' म्हणजेच आरोग्य हेच धन मानणाऱ्या नाना पटोलेंनी त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्यासाठी तसेच त्यांना वेळच्या वेळी योग्य उपचार मिळावे यासाठी भंडाऱ्यात एक उपजिल्हा रुग्णालायची संकल्पना मांडली. त्याचा फायदा साकोली, लाखानी, लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील जनतेला मिळावा यासाठी त्यांनी या उपजिल्हा रुग्णालायच्या बांधकामाला सुरूवात केली. त्यांनी गावात ॲम्बुलन्स सेवाही सुरू केली. त्याचबरोबर ते गावातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत देखील करतात. त्यामुळेच पूर्व विदर्भातील लोक नाना पटोलेंना आपला तारणहार मानतात.

नाना पटोले पूर्व विदर्भातील लोकांसाठी आशेचा किरण आहेत. याच त्याच्या विकासकामांमुळे, समाजकार्यामुळे आणि प्रेमळ व आपुलकीच्या वागणुकीमुळे ते पूर्व विदर्भातील विकास मॉडेल बनले आहेत. हेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात चालेल अशी इथल्या लोकांना खात्री वाटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com