Cashew Plantation: पाऊस कमी झाल्यावरच नवीन काजू लागवड

Cashew Farming: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव येथील शेतकरी अभिजित दशरथ पवार यांनी २५ एकरात काजूच्या नवीन लागवडीचे नियोजन केले आहे. पाऊस थांबतानाच वेंगुर्ला सात जातीच्या कलमांची लागवड केली जाणार असून बागेची गुणवत्ता सुधारण्यावर भर आहे.
Cashew Plant
Cashew PlantAgrowon
Published on
Updated on

Cashew Orchard Management:

शेतकरी नियोजन । पीक : काजू

शेतकरी : अभिजित दशरथ पवार

गाव : एडगाव, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण शेती : २५ एकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव (ता. वैभववाडी) येथे अभिजित दशरथ पवार यांची २५ एकर जमीन आहे. त्यापैकी ६ एकर गावठी काजू कलमांची लागवड होती. या वर्षी या क्षेत्रात नवीन काजू कलमांच्या लागवडीचे त्यांचे नियोजन आहे. त्यानुसार जुनाट कलमे काढून बाग स्वच्छता, लागवडीसाठी खड्डे काढणे, खड्डे भरणे,

कलमांची उपलब्धता आणि लागवड आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन लागवडीसाठी वेंगुर्ला सात या जातीची काजू कलमे निवडण्यात आली आहेत. लागवडीची पूर्वतयारी झाली असून, पाऊस थांबताच कलमांची लागवड केली जाईल, असे अभिजित पवार यांनी सांगितले.

Cashew Plant
Cashew Season: काजू हंगाम आटोपला

मागील कामकाज

मागील काही वर्षांपासून २५ एकर क्षेत्रात गावठी काजू, सागवान, आंबा, बांबू लागवड आहे. गावठी काजू झाडांपासून उत्पादन घेतले जाते होते. मात्र त्या झाडांची काजू बी आकाराने लहान असल्याने अपेक्षित दर मिळत नाही. याशिवाय ही लागवड जुनी झाल्याने उत्पादनदेखील अपेक्षित मिळत नव्हते. त्यामुळे यंदा सहा एकरांत वेंगुर्ला सात या काजू कलमांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन लागवड नियोजनानुसार जानेवारी, फेब्रुवारीपासून पूर्वतयारीस सुरुवात केली. लागवडीकरीता निश्‍चित केलेल्या क्षेत्रातील जुनी झाडे, झाडेझुडपे काढून जमीन स्वच्छ करण्यात आली. मार्च अखेरीपर्यंत हे काम सुरू होते. त्यानंतर नवीन लागवडीसाठी पूर्वतयारी करण्यात आली.

Cashew Plant
Cashew Rate : रत्नागिरीत ओल्या काजूगराला किलोला हजार रुपये दर

एप्रिल महिन्यात लागवडीकरिता आखणी करण्यात आली. निवडलेल्या क्षेत्रावर दोरीच्या साहाय्याने ७ बाय ७ मीटर अंतरावर जागा निश्चित करून जेसीबी मशिनच्या मदतीने खड्डे काढण्यात आले. हे खड्डे कोणत्याही दिशेने पाहिल्यास एका रेषेत सरळ दिसतील अशी रचना करण्यात आली आहे. जेणेकरून लागवडीनंतर बागेत हवा खेळती राहण्यास मदत होईल. तसेच सूर्यप्रकाश झाडांच्या मुळांपर्यंत पोचेल. साधारण २ बाय २ फूट लांबी रुंदीचे खड्डे खोदण्यात आले आहेत.

या खड्ड्यांमध्ये २० एप्रिलनंतर रासायनिक खतांच्या मात्रा देण्यात आल्या. त्यात सिंगल सुपर फॉस्फेट, शेणखत, निमपेंड यांच्या मात्रा देऊन खड्डे भरण्यात आले. रासायनिक खते, शेणखत आणि माती यांचे मिश्रण खड्ड्यांमध्ये मिसळले आहे.

लागवडीसाठी वेंगुर्ला सात या काजू कलमांची निवडण्यात आली. कारण इतर जातीच्या तुलनेत ही जात काजू उत्पादन, वजन, आकाराने सर्वोत्तम आहे. त्यामुळे या जातीची निवड करण्यात आली आहे. शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमांची खरेदी करण्यात आली आहे.

आगामी नियोजन

साधारणपणे ९ ते १० च्या जूनच्या दरम्यान नवीन लागवडीचे नियोजन आहे. परंतु या वर्षी मे महिन्यामध्येच मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या तरी लागवडीचा कालावधी लांबण्याची शक्यता वाटत आहे.

लागवडीसाठी कलमे आणून ठेवली आहेत. मात्र पाऊस थांबत नाही, तोपर्यंत कलमांची लागवड केली जाणार नाही. पाऊस असताना लागवड केल्यास खड्ड्यात पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळकुजीने रोपे दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर लागवड केली जाईल.

कलम लागवड केल्यानंतर जोराचे वारे, मुसळधार पाऊस यामुळे नवीन लहान कलमे उन्मळून पडण्याची शक्यता असते. याकरिता प्रत्येक कलमाला बांबूच्या काठीचा आधार देण्यात येईल. कलमांच्या मुळाजवळ पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जाईल. लागवडीनंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कलमांना रासायनिक खतांची हलकी मात्रा देण्यात येईल.

अभिजित पवार, ९६५७२५९०८०

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com