Cashew Season: काजू हंगाम आटोपला

Summer Heat Cashew Impact: या वर्षी काजूचा नियमित हंगाम विलंबाने सुरू झाला आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे लवकरच संपलाही. कडक उन्हामुळे पालवी काजू हंगामाची शक्यताही संपुष्टात आली असली, तरी जून-जुलैमध्ये काजू बीच्या दरात वाढ होण्याची आशा आहे.
Cashew Tree
Cashew TreeAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News: दर वर्षीच्या तुलनेत महिनाभर विलंबाने म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेला काजू हंगाम आटोपला आहे. मात्र त्यानंतर सुरू होणारा पालवी काजू हंगामाच्या आशा कडक उन्हामुळे मावळल्या आहेत. हंगामात उत्पादनाच्या दोन ते तीन टक्के पालवी काजू बी शेतकऱ्यांना मिळते.

लांबलेल्या पावसामुळे या वर्षी काजूच्या झाडांना ऑक्टोबर महिन्यात येणारी पालवी आणि मोहोर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात आली. त्यामुळे उत्पादनाला फेब्रुवारीच्या अखेरीस सुरुवात झाली. १५ मार्चपर्यंत अतिशय धीम्यागतीने उत्पादन सुरू झाले. त्यानंतर १५ मार्च ते २० एप्रिलपर्यंत अतिशय धीम्यागतीने हंगाम सुरू होता. गेले दहा-बारा दिवस पालापाचोळ्यात पडलेल्या काजू बी निवडण्याचे काम सुरू होते.

Cashew Tree
Cashew Rate : रत्नागिरीत ओल्या काजूगराला किलोला हजार रुपये दर

हे कामदेखील आता पूर्ण झाले आहे. त्यासोबतच या वर्षीचा काजू हंगाम आटोपला आहे. या वर्षी सुरुवातीपासूनच काजू बी ला चांगला दर होता. वेंगुर्ला येथे सात जातीच्या काजू बी ला १७० ते १८० रुपयांपर्यंत दर होता. तर सरसकट काजू बी ला प्रतिकिलो १६० ते १६५ पर्यंत दर होता. तो दर हंगाम संपेपर्यंत राहिला. या वर्षी काजू बी चे उत्पादन २५ ते ३० टक्के राहिले.

Cashew Tree
Cashew Season: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात

नियमित काजू हंगामानंतर पालवी काजू हंगाम सुरू होतो. एकूण उत्पादनाच्या २ ते ३ टक्के काजू बी शेतकऱ्यांना या हंगामातून मिळते. परंतु या वर्षी कडक उन्हाळ्यामुळे या हंगामाच्या आशा मावळल्या आहेत. दर वर्षी साधारणपणे मार्च अखेरीस हंगाम संपतो. त्यामुळे एप्रिलमध्ये हा हंगाम सुरू होतो. परंतु या वर्षी हंगाम लांबल्यामुळे पालवी काजू हंगामाच्या आशा मावळल्या आहेत.

जून, जुलैमध्ये काजू बी दरात सुधारणा होण्याचे संकेत

जिल्ह्यात या वर्षी नियमित काजू हंगाम सुरू झाल्यानंतर काजू बी ला प्रतिकिलो १६५ ते १८५ पर्यंत दर कायम टिकून राहिला. त्यामुळे या वर्षी जून, जुलैमध्ये काजू बी च्या दरात आणखी सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या काजू हंगामात प्रतिकिलो १२० ते १४५ पर्यंत दर होते. मात्र गणेशोत्सव, दिवाळी कालावधीत काजू बी चे दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे या वर्षी देखील त्यापेक्षा अधिक दर मिळेल, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com