Netafim India : क्रांतिकारी, शाश्वत शेतीचे प्रवर्तक नेटाफिम इंडिया

Irrigation Technology Netafim India : वाळवंटात शेती करण्यातून सुरुवात केलेल्या मूळ इस्राईलच्या ‘नेटाफिम’ या कंपनीने जगभरात सूक्ष्म सिंचन क्रांती घडविली. कृषितंत्रज्ञानात अग्रस्थानी असलेल्या ‘नेटाफिम’ने १९९७ मध्ये भारतात प्रवेश केला. संशोधनाअंती भारतीय शेतीस उपयुक्त ठरतील अशी सूक्ष्मसिंचन उत्पादने व सेवा द्यावयास सुरुवात केली.
Netafim India
Netafim IndiaAgrowon

Netafim India : व्यापक उत्पादन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कार्यतत्पर असलेल्या ‘नेटाफिम इंडिया’ची सूक्ष्म सिंचन (मायक्रो इरिगेशन), हरितगृह तंत्रज्ञान, समुदाय सिंचन आणि डिजिटल शेती पर्याय ही वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक दृष्टिकोनातून बाहेर पडून कंपनी शेतकऱ्यांच्या मित्राप्रमाणे सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारते.

यामध्ये व्यवहार्यता सर्वेक्षण करणे, कृषी साह्य प्रदान करणे, तांत्रिक सेवा देणे आणि भागधारकांसाठी क्षमता निर्माण करणे, शाश्वत कृषी पद्धतींना चालना देणे इत्यादींचा समावेश आहे. तीन निर्मिती सुविधा केंद्रे आणि सुमारे १,००० मनुष्यबळासोबत जवळपास २,५०० सहकाऱ्यांच्या राष्ट्रीय संपर्कजाळ्यासह ‘नेटाफिम इंडिया’ देशभरात १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचन यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे.

आजपर्यंत कंपनीने ११ लाख शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना सेवा उपलब्ध करून दिली आहे. ‘नेटाफिम इंडिया’ ही सरकारी प्रकल्पांतील सक्रिय भागीदार असून, त्यात ‘आंध्र प्रदेश मायक्रो इरिगेशन प्रोजेक्ट’ (APMIP), ‘गुजरात ग्रीन रिव्होल्यूशन कंपनी लिमिटेड’ (GGRC) आणि ‘तमिळनाडू हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट एजन्सी’चा (TANHODA), तसेच महाराष्ट्रामध्ये महाDBT, उत्तर प्रदेशमध्ये UPMIP व इतर राज्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे.

जगभरात विस्तार

१९६५ मध्ये स्थापना झालेली ‘नेटाफिम’ अल्पावधीत जगातील आघाडीची सिंचन कंपनी बनली. जागतिक सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील तब्बल ३० टक्के हिस्सा ‘नेटाफिम’कडे आहे. जगातील १२० देशांत ‘नेटाफिम’चे अस्तित्व असून, २९ उपकंपन्या आणि १७ उत्पादन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा आणि उत्पादने पुरविली जातात. उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा प्रभावी वापर करीत भरघोस पिके घेण्यासाठी अत्याधुनिक सिंचन यंत्रणांचा अवलंब करण्यावर ‘नेटाफिम’चा भर असतो. २० लाख हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा विश्वविक्रम हा ‘नेटाफिम’च्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. हवामानाची आव्हाने स्वीकारत अधिक उत्पादन मिळविण्यास जगभरातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम ‘नेटाफिम’ करते आहे. २५,००० हून अधिक कर्मचारी असलेल्या ऑर्बिया या समूहांतर्गत ‘नेटाफिम’चे काम चालते.

‘नेटाफिम इंडिया’ची घोडदौड

कंपनीच्या घोडदौडीविषयी बोलताना ऑर्बिया इंडियाचे प्रेसिडेंट रणधीर चौहान म्हणतात, की शेेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाच्या जीडीपीत कृषिक्षेत्राचा वाटा १५ टक्क्यांहून अधिक आहे. देशातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, ७० टक्के ग्रामीण कुटुंबांची उपजीविका त्यावर चालते. हवामानबदल, वाढते शहरीकरण, बदलती जीवनशैली, अन्नधान्य उत्पादनाचे घटते क्षेत्र, खालावणारा भूजलस्तर यांसह अनेक आव्हानांना तोंड देत हे क्षेत्र सातत्याने देशाच्या अन्न आणि वस्त्राच्या गरजा भागवीत आहे. देशातील सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांकडे केवळ पाच एकरांच्या आत शेती आहे. या क्षेत्रातील सकारात्मक परिवर्तनासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’च्या (RKVY) अनुषंगाने Per Drop More Crop सारख्या सूक्ष्मसिंचन उपक्रमांना चालना दिली आहे. पारंपरिक सिंचन पद्धतींच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देणे हे या धोरणात्मक बदलाचे उद्दिष्ट आहे.

‘नेटाफिम’ने १९९७ मध्ये भारतात प्रवेश केला. गेल्या २७ वर्षांत ‘नेटाफिम’ने जागतिक तंत्रज्ञानाचा भारतीय शेतीसाठी यशस्वी अवलंब केला आहे. जलसंवर्धनास चालना देत जमिनीतील पोषक तत्त्व संवर्धित करून शाश्वत कृषी जोपासण्यावर कंपनीचा भर आहे.

महाराष्ट्रात ‘नेटाफिम’चा भर तूर, हरभरा आणि सोयाबीन अशा ठिबक सिंचनाखालील पारंपरिकदृष्ट्या फारसे संशोधन न झालेल्या पीक लागवडीवर आहे. यासह कापूस, ऊस आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्यांच्या सिंचनासाठी ‘नेटाफिम’ने विशेष पर्याय विकसित केले आहेत. राज्यातील तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नेटाफिम’ जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा पुरविते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या प्रमुख कृषिक्षेत्रांत ‘नेटाफिम’चा विस्तार आहे.

Netafim India
Success Story : गोधडीला मिळाला आधुनिकतेचा बाज

ऊस-कापसासाठी ठिबक सिंचन

‘नेटाफिम इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सोनवणे सांगतात, की १९९० च्या दशकात द्राक्ष, डाळिंब, केळी यांसह भाजीपाल्यांसाठी ठिबक सिंचनाची मागणी होती. तथापि, ऊस आणि कापूस या पिकांसाठी ठिबक सिंचनास मागणी नव्हती. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून ‘नेटाफिम’ने संशोधन सुरू ठेवले आणि या पिकांसाठीही ठिबक सिंचन उपयुक्त ठरू शकते, हे पटवून दिले.

उसासाठीच्या ठिबक सिंचनास साखर कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे २००० पासून ऊस क्षेत्रात कंपनीने चांगले काम केले. सरकारच्या साहाय्याने आणि शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे कापसासाठीही ठिबक सिंचन प्रणाली वापरण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रात ऊस आणि केळी या दोन पिकांखाली तब्बल ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्र येते.

या पिकांसाठी ठिबक सिंचन प्रणाली राबविल्यामुळे ‘नेटाफिम’च्या उत्पादनांना मागणी वाढली. मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात कंपनीने वितरक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या सेवांची माहिती पोहोचविली. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब झाला व कंपनीस प्रोत्साहन मिळाले.

महाराष्ट्रातील कार्यविस्तार

‘नेटाफिम इंडिया’चे व्यवसाय विभाग प्रमुख (मध्य व उत्तर भारत) कृष्णात महामुलकर सांगतात, की ठिबक सिंचनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गेल्या तीन दशकांच्या कालावधीत ‘नेटाफिम’ने विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन केले.

सुरुवातीच्या काळात उत्पादने विकसित करण्यासाठी; तर नंतरच्या काळात त्यात सुधारणा करीत सेवांचा दर्जा उंचाविण्यासाठी या कार्यक्रमांचा उपयोग झाला. शेतकऱ्यांना विक्रीपूर्व आणि विक्रीपश्चात सेवांच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न मिळावे यासाठी ठिबक सिंचनाचे विशिष्ट संच आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. आज महाराष्ट्रात दोन वेअरहाऊस, दोन कार्यालये, ५०० हून अधिक वितरक आणि १५० कर्मचारी कार्यरत आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत

‘नेटाफिम’च्या ठिबक व तुषार सिंचन प्रणालीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढीस लागलेली असतानाच शाश्वत दृष्टिकोनातून शेतीत सुधार घडविणारी डिजिटल फार्मिंग सोल्यूशन्स (GrowSphere) आता ‘नेटाफिम’ने बाजारात आणली आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशांतही शेतकरी ‘नेटाफिम’च्या ठिबक सिंचन प्रणालीच्या साहाय्याने बिनदिक्कत शेती करू शकतो.

शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करणे, अधिक माहितीसाठी हेल्पलाईनची सुविधा देणे आणि तांत्रिक साहाय्य करून शेतीमध्ये शाश्वत पद्धतींचा समावेश करून घेण्यासाठी ‘नेटाफिम’ कायम सक्रिय असते. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम बनविणे आणि आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, यावर ‘नेटाफिम’चा विशेष भर आहे. फ्लेक्सी स्प्रिंकलर किट आणि पोर्टेबल ड्रिप किट यांसारख्या सूक्ष्म सिंचन प्रणाली ‘नेटाफिम’ने अल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत.

ठिबक सिंचन प्रणाली ही केवळ मोठ्या शेतकऱ्यांसाठी आहे, हा गैरसमज दूर करण्याचे काम ‘नेटाफिम इंडिया’ने केले, असे कृष्णात महामुलकर अभिमानाने सांगतात. ‘ग्रो मोअर विथ लेस’ हे ब्रीदवाक्य असलेले ‘नेटाफिम’ छोट्या शेतकऱ्यांना अनेक उत्पादने व सेवा पुरविते. ठिबक सिंचन प्रणालीचा खर्च छोट्या शेतकऱ्यांची इनपूट काॅस्ट वाढविणारा ठरत असला, तरी गटशेतीच्या प्रयोगातून त्यावर मात करता येते. यासाठी ‘नेटाफिम’ने कमी खर्चातील नवी उत्पादने विकसित केली अाहेत. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक स्तरातील शेतकऱ्यास सक्षम करण्याचे काम ‘नेटाफिम’ करते, याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

देशभरात वाढते जाळे

‘नेटाफिम’च्या देशभरातील विस्तार योजनांविषयी बोलताना विकास सोनवणे सांगतात, की ‘नेटाफिम’ने देशभरात तब्बल १० लाख हेक्टरवर ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली कार्यरत केली आहे. यातील ९० टक्के जमिनीवर ठिबक सिंचन; तर उर्वरित १० टक्क्यांवर तुषार सिंचन केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण, गुजरात, मध्य प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये ठिबक सिंचन प्रणालीस मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशावरही आपण आता लक्ष केंद्रित केले असून, शेतकऱ्यांमधील जनजागृतीपासून कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंतचे नियोजन पूर्ण झाले आहे.

कर्नाटकात तब्बल सव्वा लाख एकरांवर ‘नेटाफिम’तर्फे सामूहिक ठिबक सिंचन प्रणाली बसविण्यात येत आहे. ठिबक सिंचनामुळे पावसावरचे अवलंबित्व कमी झाल्याने खरिपाचे क्षेत्र ५० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पाऊस चांगला झाल्यास रब्बी पिकांसाठीही ३० टक्के क्षेत्रावर पाणी दिले जाऊ शकते. परिणामी शेतकऱ्यांना दोन पिके घेता येतात.

प्रगतिशील शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या या पद्धतींचा अभ्यास केल्यास, शेती सोपी आहे असे म्हणता येते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी शेतीचे प्रयोग करावेत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, माहिती मिळवून शेती करावी. शेतीमध्ये अधिक आव्हाने असली, तरी चांगला फायदा होऊ शकतो.

‘नेटाफिम’चे यश

जगभरात २९ उपकंपन्या, १७ उत्पादन कारखाने, ५,००० हून अधिक कर्मचारी

ठिबक सिंचनाशी संबंधित २५० पेटंट

१२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

भारतातील तीन उत्पादन प्रकल्पांत १,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत

भारतातील २६ लाख एकरांहून अधिक जमीन सूक्ष्म सिंचनाखाली

२,५०० हून अधिक वितरकांचे जाळे

शेतकऱ्यांचे ज्ञानवर्धन

तंत्रज्ञानाधारित नावीन्यपूर्ण संशोधन व उत्पादन विकसित करण्याखेरीज ‘नेटाफिम’ शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय असते. याबाबत माहिती देताना ‘नेटाफिम इंडिया’चे व्यवसाय विभाग प्रमुख (मध्य व उत्तर भारत) कृष्णात महामुलकर म्हणतात, की ‘नेटाफिम’चे ठिबक सिंचन तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना कृषिभूषण व अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

त्याचा आम्हाला अभिमान आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारयादीत अंदाजे ५० टक्के शेतकरी ‘नेटाफिम’ उत्पादने वापरणारे असतात. शेतकऱ्यांच्या ज्ञानवर्धनासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषितज्ज्ञांना आमंत्रित करून त्यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर भेट घडवून आणली जाते. तसेच महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकऱ्यांना इस्राईलसह भारतातील इतर राज्यांतील शेती दाखविण्यासाठी अभ्यासदौऱ्यांचे आयोजन केले जाते.

बेटर लाइफ फार्मिंग अलायन्स

‘नेटाफिम’ने जागतिक बँकेशी संबंधित इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी), बायर आणि स्विस आरई यांच्या सहकार्याने २०१८ मध्ये ‘बेटर लाइफ फार्मिंग’ नावाने जागतिक पातळीवर सहकार्य गट स्थापन केला.

विकसनशील देशांतील छोट्या शेतकऱ्यांना स्वस्तातील ठिबक आणि तुषार सिंचन प्रणालीसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देत शाश्‍वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा गट तयार करण्यात आला. जागतिक पातळीवर भेडसाविणाऱ्या अन्न व पाणीटंचाईसारख्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांना सक्षम बनवून त्यांची उत्पादन व उत्पन्नक्षमता वाढविणे यासाठी या गटातर्फे विविध उपक्रम हाती घेतले जातात.

Netafim India
Jaggery Industry : दौंड तालुक्यात गूळ उद्योगाचे ‘क्लस्टर’

‘नेटाफिम’ची उत्पादने

नेटाफिम संच

फ्लेक्सी स्प्रिंक्लर किट

पोर्टेबल ड्रिप किट

तुषार सिंचन उत्पादने

मिनी स्प्रिंक्लर,

मायक्रोस्प्रिंक्लर,

नेट-बो स्पेशल एमिटर

डी-नेट स्प्रिंक्लर

ठिबक सिंचन उत्पादने

एरीज ड्रिपलाईन

नवी ‘तूफान’ ड्रीपलाइन

(कमी जाडीची, जास्त टिकणारी आणि परवडणारी)

पीसीजे ऑनलाइन ड्रीपर

स्ट्रीमलाइन एक्स

ड्रीपनेट पी. सी.

ठिबक सिंचन फिल्टर

वॉल्व, इलेक्ट्रिक वॉल्व्ह

फ्लेक्झिबल व पीई पाइप्स

फ्लेक्सनेट

फ्लेक्झिबल पाईप

पोर्टेबल ड्रिप किट

फ्लेक्सी स्प्रिंक्लर किट

वॉटर मीटर

डिजिटल फार्मिंग (GrowSphere)

‘नेटाफिम’ उत्पादनांची वैशिष्ट्ये

ड्रीपलाइन (ठिबक नळी)

अत्याधुनिक इस्रायली तंत्रज्ञानाने बनविलेले ड्रीपर्स खत व पाण्याचे समान वितरण करतात. कमी गुणवत्तेच्या पाण्यासाठीही याचा वापर करता येऊ शकतो. रुंद फिल्टरेशन क्षेत्र असल्याने पाणी गाळण प्रक्रिया चांगली होते. या प्रकारच्या ठिबक नळ्या ओळीमध्ये लागवड करता येणाऱ्या, तसेच फळबागांसह बहुतांश पिकांसाठी वापरल्या जातात. या ड्रीपलाइनमुळे एकसमान ओला पट्टा निर्माण करता येतो. ड्रॉपर्स ठिबक नळीच्या आतील भागात असल्याने संच जोडणी सोपी होते. परिणामी संचाचे आयुष्य २० टक्क्यांनी वाढते. यातील दुसऱ्या प्रकारामध्ये ठिबक नळीवरही ड्रीपर्स असतात; परंतु त्याचा उपयोग मुख्यत्वे फळबागांसाठी केला जातो.

ड्रीपनेट पी.सी. (दाबनियंत्रित ठिबक नळी)

ड्रीपनेट पी.सी.तील ड्रीपर्स पाण्याचा उत्सर्ग (डिस्चार्ज) चढ-उताराच्या जमिनीवरही एकसमान ठेवतात. सेल्फ क्लिनिंग तंत्रज्ञानामुळे ड्रिपर बंद होण्याची शक्यता कमी असते. अशा प्रकारच्या ठिबक नळ्या जमिनीअंतर्गत (सब-सर्फेस) ठिबक सिंचनासाठीही वापरता येऊ शकतात. अँटी-सायफन तंत्रज्ञानामुळे ठिबक संच बंद केल्यानंतर ड्रीपरमधून मातीयुक्त पाणी शोषण्यास अटकाव होतो. परिणामी ड्रॉपर्स बंद होत नाहीत.

कमी दाबावर चालणारे ठिबक संच

कमी खर्चात ठिबक संच बसवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि वीज-पाण्याची कमतरता असणाऱ्या ठिकाणांसाठी कमी दाबावर चालणारे ठिबक संच फायदेशीर ठरतात. या यंत्रणेत ठरावीक उंचीवर पाण्याचा साठा केला जातो व सायफन पद्धतीने ठिबक नळ्यांद्वारे पिकाच्या मुळांना पाणी दिले जाते. पंपाचा खर्च वाचल्याने छोट्या क्षेत्रासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरते.

जमिनीखालील ठिबक सिंचन

सब-सर्फेस तंत्रज्ञानाचा वापर बारा महिन्यांहून अधिक कालावधीच्या पिकांसाठी (उदा. फळबागा) अथवा खोडवा घेऊ शकणाऱ्या पिकांसाठी (उदा. ऊस) फायदेशीर ठरतो. ट्रॅक्टरवर चालणाऱ्या लेइंग मशिनद्वारे दाब-नियंत्रित ठिबक नळ्या जमिनीखाली १५ सेंटिमीटरवर लावल्या जातात. या प्रणालीत पाण्याच्या प्रवाहावर अतिसूक्ष्म वाहिन्यांचे नियंत्रण असते. जमीन जसजशी भिजत जाते, तसतसा अतिसूक्ष्म वाहिन्यांचा दाब कमी होतो. जमिनीमधील छिद्रांमध्ये पाणी साठून राहिल्याने कमीत कमी खतांच्या वापरात अधिक उत्पादन घेता येते. जमिनीखाली असल्याने ठिबक नळ्यांचे संरक्षण होते व दीर्घकाळ टिकते.

स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा

पिकांना लागणारे पाणी आणि खते पूर्वनियोजित वेळेनुसार देण्याच्या प्रक्रियेस स्वयंचलित खत व पाणी व्यवस्थापन यंत्रणा म्हणतात. पिकांसाठी लागणारी योग्य पाणी आणि खतांची मात्रा स्वयंचलित यंत्रणेमध्ये नोंदविली, की ती यंत्रणा आपले कार्य सुरू करते. जोपर्यंत शेतकरी नोंदविलेल्या मात्रेत बदल करीत नाही, तोपर्यंत ती यंत्रणा नियमित कार्य करीत राहते.

नेटाजेट

गरजेनुसार खत, पाणी, सूक्ष्म अन्नद्रव्ये देणारी व खतयुक्त पाण्याची क्षारता दाखवीत पीएच नियंत्रित करणारी इस्रायली तंत्रज्ञानाने बनलेली ही यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीने खत व पाण्याचे व्यवस्थापन करते. मोठ्या क्षेत्रासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरते.

फर्टिकिट

अत्यंत कमी खर्चात खत आणि पाण्याचे व्यवस्थापन फर्टिकिटद्वारे शक्य होते. यात पीएच नियंत्रण सुविधेचाही समावेश आहे.

जागतिक अग्रणी असलेल्या ‘नेटाफिम’ने मागील २५-३० वर्षांत इस्रायली तंत्रज्ञान भारतीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. आज भारतात दहा लाखांपेक्षा अधिक शेतकरी ‘नेटाफिम’च्या सिंचन प्रणालीचा वापर करीत आहेत. या प्रणालीच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, पाण्याचीदेखील बचत होत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या राहणीमानातदेखील सुधारणा झाली आहे. हा आमचा पहिला टप्पा होता, यापुढे ग्रोस्फीयर ऑटोमेशनमार्फत शेतीला अत्याधुनिक करणे, हा आमचा दुसरा टप्पा असेल.
रणधीर चौहान, प्रेसिडेंट, ऑर्बिया इंडिया
प्रगतिशील शेतकऱ्यांनी अवलंबिलेल्या या शेतीपद्धतींचा अभ्यास केल्यास, शेती सोपी आहे असे म्हणता येते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तरुणांनी शेतीचे प्रयोग करावेत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून, माहिती मिळवून शेती करावी. शेतीमध्ये अधिक आव्हाने असली, तरी चांगला फायदा होऊ शकतो.
विकास सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी, नेटाफिम इंडिया
‘ग्रो मोअर विथ लेस’ हे ब्रीदवाक्य असलेले ‘नेटाफिम’ छोट्या शेतकऱ्यांना अनेक उत्पादने व सेवा पुरविते. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक स्तरातील शेतकऱ्यास सक्षम करण्याचे काम ‘नेटाफिम’ करीत आहे.
कृष्णात महामुलकर व्यवसाय विभाग प्रमुख (मध्य व उत्तर भारत), नेटाफिम इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com