Team Agrowon
कोकम सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार कोकम ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे.
कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी कोकम खूप उपयोगी आहेत.
आहारात कोकमाचा नियमित वापर केल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.
आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमचा वापर अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी केला जातो.
कोकमापासून अमसूल, कोकम आगळ (मिठाचा वापर करून साठवलेला रस) आणि कोकम सरबत तयार केला जातो.
कोकमाच्या बियांमधील तेलास कोकम बटर असे म्हणतात. कोकम बटरचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे किंवा मलमांमध्ये केला जातो.
आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.