Group Farming : एकत्रित पीकपद्धती, गटशेतीला प्रोत्साहन देण्याची गरज

Fertilizer Management : पाणी, शेती, रोजगार आणि पर्यावरण यांचा विचार करून शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवे. बियाणे व खतांच्या व्यवस्थापनाकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे गरजेचे आहे.
Group Farming
Group Farming Agrowon
Published on
Updated on

Nashik News : पाणी, शेती, रोजगार आणि पर्यावरण यांचा विचार करून शेतकऱ्यांनी नियोजन करायला हवे. बियाणे व खतांच्या व्यवस्थापनाकडे योग्य पद्धतीने लक्ष देणे गरजेचे आहे. विकास प्रक्रियेमध्ये पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून काम करणे आवश्यक आहे.

पाणी संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण या गोष्टींवर भर देण्यात हवा. पाण्याबरोबरच एकत्रित पीक पद्धती आणि गटशेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे प्रतिपादन शबरी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले.

Group Farming
Group Farming : शेतकऱ्यांसाठी गटशेती उत्तम पर्याय

युवा मित्र संस्थेचे संस्थापक स्व. सुनील पोटे यांनी पाणी व्यवस्थापन, कृषी विकास, पाणी वापर संस्था बांधणी, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शाश्‍वत विकासासाठी भरीव कार्य केले आहे.

Group Farming
Group Farming : मिरची पिकासाठी समूह शेतीचा पर्याय शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत

त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, जलसंधारण आणि कृषी विकास साध्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ‘सुनीलभाऊ स्मृती जलयोद्धा पुरस्कार’ आणि ‘सुनीलभाऊ स्मृती उत्कृष्ट पाणी वापर संस्था पुरस्कार’ वितरण सिन्नर येथील युवा मित्र संस्थेत पार पडला.

या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुळकर्णी यांनी प्रमुख अतिथी उपस्थिती होती. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक बच्छाव, सुरेश गायधनी यासह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. संपत काळे यांनी केले. युवा मित्रच्या २०२३-२०२४ वार्षिक अहवालाचे अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com