Group Farming : मिरची पिकासाठी समूह शेतीचा पर्याय शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत

Chili Crop : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील मिरची पिकांकरिता समूह शेती पर्याय अवलंबिल्यास हा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत ठरेल, असा विश्‍वास आत्मा प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी व्यक्‍त केला.
Group Farming
Group FarmingAgrowon
Published on
Updated on

Chandrpur News : व्यावसायिक पिकांना शाश्‍वत बाजारपेठ मिळवायची असल्यास त्याकरिता आजच्या काळात क्‍लस्टरबेस अप्रोच महत्त्वाचा ठरतो. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील मिरची पिकांकरिता समूह शेती पर्याय अवलंबिल्यास हा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत ठरेल, असा विश्‍वास आत्मा प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर यांनी व्यक्‍त केला.

महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गंत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, प्रकल्प संचालक आत्मा, कृषक स्वराज्य स्पायसेस शेतकरी उत्पादक कंपनी राजुरा यांच्या संयुक्‍त सहकार्याने आयोजित मिरची-उत्तम कृषी पद्धती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.

Group Farming
Group Farming : शेतकऱ्यांसाठी गटशेती उत्तम पर्याय

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझेले, मॅग्नेटचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, रुपिया फिनोवेन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी धवल शहा, मॅग्नेटच्या मास्टर ट्रेनर प्रिया झाडे, सुमेध कांबळे, ओमप्रकाश सुखदेवे, सतीश गिरसावळे यांची या वेळी उपस्थिती होती.

व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रतवारी केलेल्या शेतमालाची उपलब्धता असेल तर अशा ठिकाणावरून खरेदीसाठी ते देखील इच्छुक राहतात. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी क्‍लस्टरबेस शेतीचा विचार केला पाहिजे. व्यावसायिक पिकात हा पर्याय महत्त्वाचा ठरतो. श्री. फुलझेले यांनी चंद्रपूर जिल्ह्यात मिरची पीक लागवडीला वाव असल्याचे सांगितले.

Group Farming
Group Farming Program : गटशेती कार्यक्रम राज्यभर राबविणार : आमीर खान

मिरचीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नाबार्डमार्फत आवश्‍यक ती मदत केली जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. धवल शहा यांनी मिरचीचे जैविक पद्धतीने उत्पादन व व्यवस्थापन याविषयी तांत्रिक माहिती दिली. सतीश गिरसावळे यांनी मिरची पिकातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावरील संधी याविषयी मार्गदर्शन केले.

मिरची पिकाचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, पॅकेजिंग, साठवणूक यासंदर्भाने प्रिया झाडे यांनी माहिती दिली. ओमप्रकाश सुखदेवे यांनी सामाजिक समावेशन व लैंगिकसमानता याबाबत सविस्तर विवेचन केले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला नागपूर विभागात मिरची पीक विषयक प्रशिक्षण घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हेमंत जगताप यांनी आभार मानले. सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com