Agriculture Sector : कृषी क्षेत्रासाठी बाबासाहेबांच्या विचारांची आवश्यकता : डॉ. तायडे

Lecture on 'The Problem of Rupee' :पौंड आणि रुपयाचा विनिमय दर ठरविण्यासाठी सुवर्ण प्रतिमान कसे योग्य होते हेच त्यांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या ग्रंथात मांडले आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सिडनहॅम कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. बी. तायडे यांनी केले.
Dr. V.B.Tayde
Dr. V.B.TaydeAgrowon

Buldhana News : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास जिकरीचा होता. परंतु त्यांचा आर्थिक विचार प्रचंड धाडसी आणि अभ्यासू होता. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथात ब्रिटिशांनी रुपयांचे अवमूल्यन करून भारताची कशी लूट केली हेच त्यांनी सांगितले आहे.

पौंड आणि रुपयाचा विनिमय दर ठरविण्यासाठी सुवर्ण प्रतिमान कसे योग्य होते हेच त्यांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या ग्रंथात मांडले आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सिडनहॅम कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. बी. तायडे यांनी केले.

Dr. V.B.Tayde
Grape Export : भातपट्ट्यातून रंगीत द्राक्षांची निर्यात

स्थानिक जिजामाता महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग व आंबेडकरी साहित्य अकादमी व प्रगती वाचनालय, वीर भगतसिंग क्रीडा मंडळ, विदर्भ साहित्य संघ, शिवजागर मंच व शहर ए गजल मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या ग्रंथाच्या शताब्दी निमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित दी प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाची शताब्दी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Dr. V.B.Tayde
Sugarcane Production : साखरेच्या सरासरी उताऱ्यात ०.२० टक्क्यांनी वाढ, उसाचा दर वाढणार का?

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे हे होते. या वेळी इतिहास संशोधक रवींद्र इंगळे चावरेकर, आशा तायडे व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. जे. कांदे उपस्थित होते. डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रूपाली हिवाळे यांनी केले. शशिकांत इंगळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. डी. जे. कांदे यांनी मानले. राम सोनुने, प्रमोद टाले, संजय खांडवे, रविकिरण टाकळकर, संदीप राऊत, रवींद्र साळवे, शशिकांत इंगळे, रविकिरण वानखेडे, सुदाम खरे, कल्पना माने यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com