Agriculture Value Addition : शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची गरज ः कुलगुरू डॉ. गडाख

Dr. Sharad Gadakh : आपला देश धान उत्पादनात स्वयंपूर्ण होत शाश्वत शेती व आत्मनिर्भर शेतकरी ही पंतप्रधानांची भूमिका वास्तवात साकारण्यासाठी धान उत्पादक विभागात एकात्मिक शेती पद्धतीच्या अवलंबा सोबतच कृषी प्रक्रिया केंद्राची उभारणी काळाची गरज असल्याचे डॉ. गडाख यांनी याप्रसंगी प्रतिपादित केले.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : हवामान बदलाच्या या कालखंडात शेती विषयक समस्यांचे समयोचित शाश्वत समाधान शोधून वेळेत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांच्या संयुक्त सहकार्याने कृषी संशोधन केंद्र, तारसा येथील प्रक्षेत्रावर विद्यापीठ संशोधित धान पिकाच्या ‘पीडीकेव्ही तिलक’ वाणाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि शेतकरी वर्गाला अध्यक्षस्थानावरून संबोधन करताना ते बोलत होते.

आपला देश धान उत्पादनात स्वयंपूर्ण होत शाश्वत शेती व आत्मनिर्भर शेतकरी ही पंतप्रधानांची भूमिका वास्तवात साकारण्यासाठी धान उत्पादक विभागात एकात्मिक शेती पद्धतीच्या अवलंबा सोबतच कृषी प्रक्रिया केंद्राची उभारणी काळाची गरज असल्याचे डॉ. गडाख यांनी याप्रसंगी प्रतिपादित केले.

Agriculture Technology
Cotton Value Addition : ‘कांचनी’ने केली ३७ कोटींची उलाढाल

विद्यापीठ संशोधित धान पिकाच्या ‘पीडीकेव्ही तिलक’ वाणाची लागवड व शेतकरी उत्पादक कंपन्याचे माध्यमातून धान प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व इतर सर्वच समांतर संस्थांनी एकात्मिक प्रयत्नांची गरज देखील गडाख यांनी प्रतिपादित केली.

आपल्या अतिशय संयमी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात डॉ. गडाख यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व महाबीज यांचे संयुक्त प्रयत्न शेतीला सुगीचे दिवस आणण्यात साहाय्यभूत ठरतात असे सांगताना मॉडेल विलेज निर्मितीच्या विद्यापीठाच्या उपक्रमाचे सर्वच समांतर संस्थाने सहभाग नोंदवत आदर्श गाव निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

Agriculture Technology
Agriculture Value Addition : शेतीमालाच्या मूल्यवर्धनातूनच आर्थिक सक्षमता : डॉ. गडाख

तर पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी अकोला कृषी विद्यापीठाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांनी केले.

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ‘पीडीकेव्ही तिलक’ वाणाचे पैदासकार डॉ. जी. आर. श्यामकुंवर यांनी उपरोक्त वाणाबाबत सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, महाबीजचे विभागीय एल. एच. मेश्राम यांचे सह कृषी संशोधन केंद्र तारसाचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. के. बिरादार यांची व्यासपीठावर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com