Amaravati News : ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा चौथा हप्ता येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील २ लाख ७२ हजार १९८ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. तथापि, या चौथ्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच नमो योजनेचा लाभ मिळणार आहे.
गत वर्षीच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान शेतकरी’ योजना जाहीर केली आहे. पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत. त्यानुसार गतवर्षी तीन व यंदा चौथा हप्ता देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाचवा हप्ताही देण्याची योजना राज्य सरकारची असल्याचे समजते.
चौथ्या हप्त्यासाठी पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेत जिल्ह्यातील २ लाख ७२ हजार १९८ शेतकरी पात्र ठरले आहेत. या योजनेत २ लाख ८५ हजार १५७ शेतकऱ्यांनी अर्ज केले असले तरी ६ हजार ८२६ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही.
तालुकानिहाय शेतकरी : अचलपूर : २२,१८३, अमरावती : १६,२७९, अंजनगावसुर्जी : १९,२४५, भातकुली : १५,९९१, चांदूररेल्वे : १३८७९, चांदूरबाजार : २६,३३२, चिखलदरा : १०,४८६ ,दर्यापूर : २४,१२२, धामणगावरेल्वे : १७,९६६, धारणी : १६,३१०, मोर्शी : २५०५२, नांदगाव खंडेश्वर : २२,८०५, तिवसा : १५,०६४, वरुड : २६,४८४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.