Malegaon Sugar Factory: ‘माळेगाव’साठी राष्ट्रवादीच्या पॅनलपूर्व मुलाखती ठरल्या लक्षवेधी

NCP Panel Interview: माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या गटनिहाय मुलाखती घेत राष्ट्रवादी पॅनलसाठी विश्वासार्ह उमेदवार निवडण्यावर भर दिला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Baramati News: माळेगावकडून विक्रमी ऊस दराची परंपरा कायम ठेवायची असेल आणि या साखर कारखान्याचा शाश्वत विकास साधायचा असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करा. मतदानात चुकीचे काम करणाऱ्या कार्य क्षेत्रातील ठराविक लोकांची मक्तेदारी मोडणार आहे, असा संवाद साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीमधून विश्वासात घेतले.

माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक आता निर्णायक वळणार येऊ लागली आहे. सत्ताधारी, विरोधक आपापले पॅनल जाहीर करताना सावध भूमिका घेत आहेत. अजित पवार यांनी सोमवारी (ता. २) बारामतीत राष्ट्रवादी पक्षाचा पॅनल जाहीर करण्याअगोदर पक्षाकडे इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सहा गटनिहाय मुलाखती घेतल्या. बारामती, माळेगाव, पणदरे, सांगवी, नीरावागज, खांडज-शिरवली या गटातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Ajit Pawar
Chhatrapati Sugar Factory: छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक

या मुलाखतींमध्ये पक्षीय अदलाबदली नको, गावकी व भावकीचे राजकारण नको, ऊस दर चांगला दिला, दादा आता घराणे शाही थांबवा, उमेदवारी देताना निष्टावंतांबरोबर इच्छुकांचे वर्तन तपासा, अंहकारी संचालकांना पुन्हा संधी नको, दादा तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही स्वीकारू अशा भावना इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

Ajit Pawar
Sugar Factory : ‘वसंतदादा’ कारखाना ताब्यात घेण्याचा जिल्हा बॅंकेचा इशारा

पक्षाच्या पॅनेलबाबत पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा पॅनेल सर्व इच्छुकांची मते जाणून घेतल्याशिवाय कसे जाहीर करू. त्यामुळे माध्यमांत अथवा कार्यकर्त्यांत होत असलेल्या पॅनलमधील नावांची चर्चा निरर्थक आहे. अद्याप अधिकृत पॅनल जाहीर झाला नाही.’

मुलाखतींची पद्धत आवडली

माळेगावच्या निवडणुकीबाबत अथवा गाव पातळीवर राजकारणाचे विषय बोलताना कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार अजित पवार यांच्याशी मनमोकळे बोलत होते. मुलाखतीच्या वेळी पक्षाचा अथवा कारखान्याचा पदाधिकारी पवार यांच्यासमवेत नसल्याने संबंधितांना बोलताना संकोच नव्हता. त्यामुळे दादांच्या मुलाखतीची पद्धत आम्हाला आवडल्याचे अनेकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com