
Pune News : शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न... याच विषयाला हात घालणारा चित्रपट ‘नवरदेव (Bsc Agri)’ २६ जानेवारीला प्रदर्शित होतोय. नुकताच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसादही दमदार मिळतोय.
तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेतील क्षितीश दाते पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या साथीला प्रियदर्शिनी इंदलकर, नवरी म्हणून त्याला मिळणार की नाही, हे चित्रपटगृहात जाऊनच बघावं लागेल! बीएससी अॅग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.
दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील ‘लाल चिखल’ हे रॅप नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं! याचे शब्द आणि लय ही मनाला पिळवटून टाकणारी आहे.
अभिनेता क्षितीश दाते या चित्रपटात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल, त्यासोबतच प्रवीण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळेल.
एका गंभीर सामाजिक प्रश्नाला हलक्या-फुलक्या पद्धतीत प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम या चित्रपटाची टीम करत आहे. आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.