CNG Rate : नॅचरल उद्योग समुहाच्या सीएनजीचा दर सर्वांत कमी : ठोंबरे

Natural Udyog Samuh : नॅचरल शुगरने २०२२ मध्ये बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून केली.
Natural Udyog Samuh
Natural Udyog Samuh Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : नॅचरल शुगरने २०२२ मध्ये बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून केली. आता प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली आहे. बायो सीएनजीची विक्री लातूर, परळी शहरांमध्ये सुरू आहे. नॅचरल शुगरने शिंगोली-धाराशिव येथे सीएनजी पंपाची उभारणी केली असून, हा पंप २४ तास सुरू राहणारा एकमेव असल्याचे नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.

श्री. ठोंबरे म्हणाले, की भारताच्या भविष्यातील प्रदूषणमुक्त इंधनाची गरज लक्षात घेऊन आणि साखर कारखान्यामध्ये उत्पादित टाकाऊ पदार्थांपासून इंधन निर्मिती करण्याचा संकल्प हाती घेऊन, सीएनजी प्रकल्पाची उभारणी अल्पावधीतच पूर्ण केली आणि ‘नॅचरल बायो सीएनजी’ ग्राहकांना उपलब्ध करून दिला.

Natural Udyog Samuh
Sharad Pawar : पवारांच्या हस्ते बायो-सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन

सीएनजी प्रकल्पामुळे उत्पादित होणाऱ्या पर्यावरणपूरक इंधनामुळे देशाचे परकीय चलनही काही अंशी वाचेल तसेच प्रदूषणासही आळा बसण्यास मदत होणार आहे. नॅचरल शुगर कारखान्याच्या माध्यमातून उस्मानाबाद शहर व महामार्गावरील ग्राहकांना बायो सीएनजी उपलब्ध व्हावा यादृष्टीने नवीन बायो सीएनजी पंपाचे भूमीपूजन मागील दीड वर्षांपूर्वी केले होते,

Natural Udyog Samuh
Sharad Pawar : सीएनजी, हायड्रोजन गॅस निर्मितीकडे वळावे ः पवार

परंतु शासकीय सर्व मान्यता घेण्यास खूप मोठा वेळ वाया गेला. सर्व शासकीय मान्यता घेऊन शिंगोली येथे सीएनजी पंप सुरू केला आहे. दिवाळी सणानिमित्त कमीत कमी दर ७५ रुपये प्रति किलो ठेवलेला आहे, जो महाराष्ट्रामध्ये इतरांपेक्षा सर्वांत कमी दर आहे.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत विठ्ठल शिंदे, कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, शिंगोलीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com