Crop Inspection
Natural Farming Agrowon

Natural Farming : नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या पिकांची करणवाल यांच्याकडून पाहणी

Crop Inspection : सपीके तंत्रज्ञानावर असलेली आर्या नैसर्गिक शेती कशी केली जाते, ते करणवाल यांनी सर्व पिकाची पाहणी करून जाणून घेतले.
Published on

Nanded News : लोहा तालुक्यातील दापशेड येथील आर्या नैसर्गिक शेती येथे शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नैसर्गिक शेती शिवारास भेट देऊन पाहणी केली.

एसपीके तंत्रज्ञानावर असलेली आर्या नैसर्गिक शेती कशी केली जाते, ते करणवाल यांनी सर्व पिकाची पाहणी करून जाणून घेतले. घनामृत, जिवामृत, दशपर्णी घटक बनविण्याच्या पद्धतीची पाहणी केली.

Crop Inspection
Natural Farming : रसायनमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी नैसर्गिक शेती पद्धतीचा स्वीकार गरजेचा

या वेळी आर्या नैसर्गिक शेतीचे प्रमुख गोविंदराव होळगे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी विश्‍वनाथ होळगे यांनी आर्या नैसर्गिक शेतीमध्ये केलेले योगदान, नैसर्गिक शेती कशी केली जाते याविषयी माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. मानवी आरोग्य चांगले राहायचे असेल तर विषमुक्त अन्न आरोग्यास फायदेशीर आहे.

Crop Inspection
Natural Farming : पालघरची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल

आर्या नैसर्गिक शेतीचे चाललेले कार्य हे अविरतपणे चालत राहावे कुठलीही अडचण आल्यास प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे त्यांनी बोलताना सांगितले.

कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार येतवडे, तंत्र अधिकारी अरुण घुमनवाड, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, लोहा गटविकास अधिकारी आडेराघो, कृषी अधिकारी श्री वावळे यांच्यासह आर्या नैसर्गिक शेतकरी गटाचे सदस्य, उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com