Export of Broken Rice : तुकडा तांदळाच्या निर्यातीला केंद्र सरकारची मुदतवाढ

Extends the Period of Export of Broken Rice : केंद्र सरकारने सेनेगल आणि गांबिया या देशांना होणाऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीबाबात निर्णय घेतला आहे.
Broken Rice
Broken RiceAgrowon

Pune News : लोकसभा निवडणुकीचा निकाल दोनच दिवसांपूर्वी लागला. आचारसंहिता संपताच विदेश व्यापार महासंचालनालयाने तुकडा तांदळाच्या निर्यातीबाबत निर्णय घेतला आहे. महासंचालनालयाने सेनेगल आणि गांबिया या देशांना होणाऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीला सहा महिन्यांची वाढ केली आहे. याबाबत महासंचालनालयाने बुधवारी (ता.५) अधिसूचना काढली.

महासंचालनालयाने क्रमांक १५/२०२४-२५ प्रमाणे दिनांक ५ जून, २०२४ रोजी सदरची आधिसूचना जारी केली आहे. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचना क्रमांक ४६ मध्ये सुधारणा करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर या सुधारणेनुसार नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड मार्फत सेनेगल आणि गांबियाला होणाऱ्या निर्यातीच्या कालावधीत सहा महिन्यांची वाढ करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Broken Rice
Exports of Broken Rice : तुकडा तांदूळ निर्यातीस केंद्राची परवानगी

तसेच सेनेगल आणि गांबियासाठी होणाऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीचा कालावधी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर या सुधारणेत फक्त कालावधीत बदल करण्यात आला असून मूळ अधिसूचनेतील इतर सर्व तरतुदी कोणतेच बदल होणार नसल्याचे म्हटले आहे. तर परकीय व्यापार (विकास आणि नियमन) कायदा-१९९२ आणि विदेशी व्यापार धोरण- २०२३ मधील संबंधित कलमांतर्गत सुधारणा करण्यात आल्याचेही महासंचालनालयाने म्हटले आहे.

Broken Rice
Indian Broken Rice ची China Import का वाढवतोय? |Rice Export|ॲग्रोवन |

तुकडा तांदळाची निर्यातबंदी

दरम्यान दोन वर्षांपूर्वी रशिया-युक्रेन युद्धामुळं जागतिक बाजारात तांदळाला मागणी वाढली होती. त्यावेळी देशांतर्गत तांदळाचा परवठा कमी होईल आणि गव्हाप्रमाणं तांदळाचेही दर भडकतील अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने ८ सप्टेंबर २०२२ रोजी तुकडा तांदळाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तसेच सरकारने भात, ब्राऊन राईस आणि बासमती वगळता इतर तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लागू केले.

या देशांना झाली निर्यात

त्यानंतर भारत सरकारने मे २०२३ मध्ये आपल्या निर्यातबंदीच्या धोरणात सुधारणा केली. तसेच सेनेगल, गाम्बिया आणि इंडोनेशिया या देशांना तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली. तर ज्या देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांदळाची आवश्यकता आहे. त्यांनी मागणी केल्यास तुकडा तांदूळ निर्यात करण्यात येईल असे सरकारने म्हटले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com