
Nashik News : आर्थिक अडचणींत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बाहेर काढण्यासाठी आता कर्ज सामोपचार योजना आणली आहे. जिल्हा बँकेचा संचित तोटा ८५२ कोटींवर पोहोचला, तर एनपीए ६९.५० टक्क्यांवर पोहोचल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे.
जिल्हा बँकेत किमान ११ लाख ठेवीदार आणि अडीच लाख शेतकरी, विविध कार्यकारी संस्था, आदिवासी संस्था, अनेक सहकारी संस्था व त्यांच्याशी निगडित सेवक व सभासद, असे एकूण सुमारे २० ते २५ लाख लोक बँकेशी निगडित आहेत. बँक अडचणीत सापडल्याने त्यांच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
शेतकरी सभासदांकडे बँकेचे एकूण संस्थापातळीवर मुद्दल ९९१ कोटी व त्यावरील व्याज १,३०१, अशी एकूण २,२९३ कोटी थकबाकी आहे. थकबाकीदार सभासदांचा विचार करून बँकेने सामोपचार कर्ज परतफेड योजना अमलात आणली आहे. बँक व संस्था मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत असून, पीक कर्जासाठी आठ टक्के व मध्यम मुदत कर्जासाठी दहा टक्के सरळ व्याजदराने आकारणी करण्यात येईल.
कर्जवसुली होत नसल्याने बँकेने २०२४-२५ या वर्षासाठी योजना लागू केली. थकबाकीदार आपली थकबाकी भरून कर्जमुक्त होऊ शकतात. नवीन पीककर्ज घेण्यासाठी पात्र होऊ शकतात. मुदतीत परतफेड करून शासनामार्फत शून्य टक्के व्याजदराने पीककर्जाचा लाभही घेऊ शकतात. अपेक्षित कर्जवसुली झाली नाही, तर बँक कठोर पावले उचलण्याच्या विचारात आहे.
थकीत कर्जदारांनी कर्ज परतफेड करून बँकेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी केले आहे.जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीविरोधात आवाज उठविणारे भगवान बोराडे व कैलास बोरसे यांना जिल्हा बँकेने दणका दिला आहे.
जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असल्यामुळे सभासद व ठेवीदारांना देण्यासाठी बँकेकडे पैसेच शिल्लक नाहीत, त्यामुळे सामोपचार कर्ज योजनेतूनच कर्ज परतफेड करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी बोराडे व बोरसे यांना दिले आहे.
कर्जदारांचे प्रमाण
जिल्हा बँकेचे ५ वर्षांवरील थकबाकीदारांचे शेकडा प्रमाण ८४ टक्के आहे, तसेच ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज शेकडा प्रमाण २४ टक्के आहे. दहा लाखांवरील थकबाकीदारांचे शेकडा प्रमाण ३९ टक्के आहे. म्हणजेच पाच लाखांवरील थकबाकीदारांचे शेकडा प्रमाण ६३ टक्के आहे.सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून बँक कलम १०१,१०७ नुसार कायदेशीर कारवाई करीत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.