Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेला मिळणार ६३५ कोटींचे भाग भांडवल

Co-Operative Bank : आर्थिक अडचणींत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६३५ कोटींचे ‘शेअर कॅपिटल’ (भाग भांडवल) पाच टप्प्यांत उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Nashik DC  Bank
Nashik DCC BankAgrowon
Published on
Updated on

Nashik News : आर्थिक अडचणींत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६३५ कोटींचे ‘शेअर कॅपिटल’ (भाग भांडवल) पाच टप्प्यांत उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सहकार विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या हमीमुळे जिल्हा बँक ऊर्जितावस्थेत येण्याची शक्यता वाढली आहे. मात्र या बाबत कार्यवाही नेमकी कशी होते याकडे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २९) मंत्रालयात जिल्हा बँकेसंदर्भात बैठक पार पडली. या वेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा बँक कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव आदी उपस्थित होते.

Nashik DC  Bank
Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँक कर्जवाटपात दोषी संचालकांवर गुन्हा दाखल करावा

जिल्हा बँकेने १०६० प्राथमिक शेती व आदिवासी संस्थांमार्फत ९९ हजार सभासदांना एकूण १७३४ कोटींचे शतीकर्ज वाटप केले आहे. त्यापैकी ५६ हजार थकबाकीदारांकडे १३१३ कोटींची थकबाकी झाली. १०२४ कोटी रुपये एनपीए झाला आहे. थकबाकीची वसुली होत नसल्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना वेळेवर पैसे परत करणे शक्य होत नाही. त्यासाठी बँकेने आता कर्ज परतफेड सामोपचार योजना सुरू केली आहे.

योजनेच्या निकषानुसार सरळ व्याजाने पीककर्जास आठ टक्के व मध्यम मुदत कर्जास दहा टक्के व्याजदराची आकारणी करण्यात येते. बँकेच्या वसुली मोहिमेस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे.

त्यातून मार्ग काढण्यासाठी बँक प्रशासनाने ६३५ कोटींच्या भाग भांडवलाची मागणी राज्य सरकारकडे केली होती. यासंदर्भात बुधवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठक घेतली. त्यात बँकेला पाच टप्प्यांत ही रक्कम देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येईल.

Nashik DC  Bank
Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेतर्फे सामोपचार कर्ज परतफेड योजना

येत्या १५ दिवसांत हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावास ‘नाबार्ड’च्या अधिकाऱ्यांनीही होकार दर्शविला आहे. बुलडाण्याच्या धर्तीवर केंद्रातील भाजप सरकारच्या मदतीने नाशिक जिल्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मदत करणार असल्याचा शब्द पवार यांनी आमदार दिलीप बनकर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचार सभेत पिंपळगाव बसवंत येथे दिला होता. अखेर त्यानुसार हालचाली सुरू झाल्या आहेत.

‘नाबार्ड’ची सहमती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीस ‘नाबार्ड’चे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पवारांनी पाच टप्प्यांत भाग भांडवल देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास ‘नाबार्ड’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही संमती दिल्याचे समजते. त्यामुळे भाग भांडवलाच्या माध्यमातून बँक आर्थिक अडचणीतून बाहेर पडेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com