

Green Fodder : जनावरांच्या आहारात जास्त प्रमाणात खुराक आणि कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाण राहिल्यास त्याच्या पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. जनावरांची निरोगी वाढ आणि प्रजनन क्षमता टिकविण्यासाठी हिरवा चारा आवश्यक असतो. हिरव्या चारा दिला जात नसेल तर, गायींना कमजोर आणि रोगट वासरे निपजतात. जनावरांना दिल्या जाणाऱ्या हिरव्या चाऱ्यामध्ये संकरित नेपियर हे एक महत्वाच चारा पीक आहे. वर्षाल ६ ते ७ कापण्या देणारं हे चारा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते. या चाऱ्याच्या लागवडीसाठी जमीन ही खोल, मध्यम ते भारी, काळी कसदार उत्तम निचऱ्याची निवडावी. जमिनीची खोल नांगरट करुन कुळवाच्या दोन आडव्या, उभ्या पाळ्या घालून जमीन तयार करावी. त्यामुळे गवताची जोमदार वाढ होते आणि फुटवे चांगले फुटतात.
सुधारित वाण आणि वाशिष्ट्ये
या पिकाचे तीन वाण महत्वाचे आहेत फुले जयवंत, फुले यशवंत आणि फुले गुणवंत. हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केले आहेत. यापैकी फुले जयवंत म्हणजेच आरबीएन -१३ या वाणाच्या हिरव्या चाऱ्यात ऑक्झॉलिक आम्लाचे प्रमाण हे १.९१ टक्के, स्निग्ध पदार्थ २.३८ टक्के तसच एकूण पचनियता ६१.८ टक्के असते. पानावर कूस कमी प्रमाणात असल्याने जनावरे हा चारा आवडीने खातात. चारा कापणीनंतर पुन्हा जोमाने लांब, भरपूर वाढतो. पाने रुंद आणि फुटवे मऊ, लांब असतात. हे वाण वर्षभर कोणत्याही हंगामात लागवड करता येते. पहिली कापणी ९ ते १० आठवडे नंतरच्या कापण्या ३ ते ७ आठवड्यांनी करता येतात.
संकरित नेपीयरचे दुसरे महत्वाचे वाण आहे फुले यशवंत. हे वाण कापणीनंतर जोमाने वाढते. पाने जास्त लांब असतात आणि भरपुर फुटवे येतात. पाने मऊ, रुंद आणि कमी लव असणारे असतात.
फुले गुणवंत हे संकरित नेपियरचे तिसरे महत्वाचे वाण आहे. या वाणाचा चारा पालेदार, मऊ, लांब आणि रुंद पानाचा असतो. या वाणामध्ये प्रथिने ९ ते १० टक्के, पचनियता५६ टक्के ऑक्झॉलिक आम्ल २.०५ या प्राणात घटक आढळतात.
लागवड पद्धत
या गवताची लागवड ठोंबे लावावीत. लागवडीसाठी साधारणपन ३ महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाचा वापर कराना खोडाचा वापर करताना खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील २ ते ३ डोळे असणाऱ्या कांड्या काढून लागवड करावी. या गवताची लागवड ९० बाय ६० सेंमी अंतरावर म्हणजे ३ बाय २ फूट अंतरावर करावी. गवताचे ठोंब ९० सेंमी अंतरावर म्हणजे ३ फुट काढलेल्या सीच्या बगलेत मुळासहित गवताची ठोंब डोळे असणाऱ्या कांड्याद्वारे लागवड करावी. दोन डोळे जमिनीत आणि एक जमिनीवर राहील अशा पद्धतीने लागवड करावी. दोन झाडांमध्ये २ फुट अंर ठेवावे. एका ठिकाणी एक जोमदार ठोंब लावल्यास हेक्टरी १८५०० ठोंब पुरेसे होतात.
या गवताची हिरव्या चाऱ्यासाठी कापणी ६० ते ६५ दिवसांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सेंमी उंचीवर केल्यास फुटवे चांगले फुटण्यासमदत होते. नंतरच्या कापण्या पीक वाढीनूसार ४५ ते ५० दिवसांनी कराव्यात. अशाप्रकारे वर्षभरात ६ ते ७ कापण्या घेता येतात. या गवतापासून हेक्टरी १०० ते १५० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
---------
माहिती स्त्रोत - कृषी पत्रिका, डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.