Team Agrowon
नेपियर गवताला हत्ती गवत असंही म्हणतात. साधारण फेब्रुवारी - मार्च मध्ये या गवताची लागवड करता येते.
नेपियर लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि २ ते ३ वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.
कापणी लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सें. मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते.
उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. या काळात जनावरांसाठी नेपियर गवत चांगला पर्याय आहे.