Drone Farming: ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणीचे सवणा येथे प्रात्यक्षिक

Agriculture Innovation: चिखली तालुक्यातील सवणा येथे विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत नुकतेच अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
Drone Farming
Drone FarmingAgrowon
Published on
Updated on

Buldhana News: चिखली तालुक्यातील सवणा येथे विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत नुकतेच अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमात ड्रोनच्या सहाय्याने नॅनो युरिया फवारणीचे थेट प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना नव्या कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली.

Drone Farming
Fertilizer Demand : रायगडमध्ये खरिपासाठी हवे ११,९३२ टन युरिया

या कार्यक्रमात बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. सुकेशनी वने, डॉ. भारती तिजारे, प्रवीण देशपांडे, कोकिळा भोपळे, तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे शास्त्रज्ञ डॉ. बेनुकांथा दास यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

Drone Farming
Natural Farming : मोहोळच्या कृषी विज्ञान केंद्रात कृषीसखींना नैसर्गिक शेतीवर प्रशिक्षण

चिखली तालुक्यातील वळती, सवणा, चांदई, धोडप तसेच बुलडाणा तालुक्यातील बिरसिंगपूर, देऊळघाट, उमाळा, गिरडा, मढ आदी गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात आले. या अभियानात वैज्ञानिकांचे पथक दररोज आठ ते दहा गावांत रथयात्रेद्वारे पोहोचत असून शेती व विज्ञान यामधील दरी कमी करणे, तसेच शेतीत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात इफको संस्थेचे सहकार्य लाभले असून प्रक्षेत्र अधिकारी कल्याण अटकळे, मार्केटिंग अधिकारी शंतनू चवंड व योगेश पाटील यांनी समन्वयाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सवणा येथील प्रगतशील शेतकरी विजय भुतेकर यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com