Farmers Study Tour
Farmers Study TourAgrowon

Farmer Tour : परदेश अभ्यास दौऱ्यासाठी ३० जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Farmer Study Tour : या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा.
Published on

Nanded News : जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौरे २०२५-२६ ही योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या दौऱ्यासाठी ३० जुलै पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत.

प्राप्त अर्जातून चार ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Farmers Study Tour
Farmer Foreign Tour : राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी

या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे सातबारा व ८-अ उतारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे वय २५ वर्ष पूर्ण असावे, शेतकरी तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. शेतकरी वैध पारपत्र (पासपोर्ट) धारक असावा.

शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसावा तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे, अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान म्हणून देय आहे. पात्र शेतकऱ्यांनी विहित वेळेत ३० जुलै पूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत असे कळविले आहे.

Farmers Study Tour
Government Study Tour : अभ्यास दौऱ्यांचे फलित काय?

या देशात होणार अभ्यास दौरा

१) फलोत्पादन, सेंद्रियशेती आणि दुग्धोत्पादन ः दौरा १२ दिवस (युरोप-नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स)

२) आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषीयांत्रिकीकरण ः दौरा ९ दिवस (इस्राईल)

३) सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान- दौरा १० दिवस (जपान)

४) फळे व भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान दौरा १२ दिवस (मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स)

५) विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्पो दौरा ८ दिवस (चीन)

६) आधुनिक कृषी अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान दौरा ८ दिवस (दक्षिण कोरिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com