Nanded Rain : नांदेडला दमदार पावसाने खरीप सुखावला

Monsoon Update : नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. ७) रात्री मोसमातील पहिला मोठा पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यातील भोकर तालुका वगळता इतर सर्वच १५ तालुक्यात दमदार झाला.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. ७) रात्री मोसमातील पहिला मोठा पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्यातील भोकर तालुका वगळता इतर सर्वच १५ तालुक्यात दमदार झाला. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोमवारी (ता. ८) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३२.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे आजपर्यंत पडणाऱ्या पावसाने सरासरी गाठल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यात एक जूनपासून पावसाला सुरवात झाली. परंतु हा पाऊस दमदार नव्हता. केवळ पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जूनच्या पंधरा तारखेपासून खरिपातील पेरण्यांच्या कामांना सुरवात केली. यानंतर काही दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्यांची कामे खोळंबली होती. परंतु यानंतर मात्र काही ठराविक दिवसांनी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपत आल्या आहेत.

Rain Update
Monsoon Rain : संततधारेमुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती

मागील आठवड्यात शेतकरी सोयाबीनला कोळपणी, कपाशील वखरणीसह खते देण्याच्या कामाला लागले होते. अशातच शुक्रवारीपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. शनिवारी काहीसा मंदावलेल्या पावसाने रविवारी (ता. ७) दमदार सुरवात केली. हा पाऊस जिल्ह्यातील भोकर, उमरी व हिमायतनगर तालुके वगळता इतर १३ तालुक्यात मात्र जोरदार झाला.

पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या नांदेड, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, किनवट, माहूर या तालुक्यातील ९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात कंधार तालुक्यातील फुलवळ मंडळात १३२ मिलिमीटर तर लोहा तालुक्यातील माळाकोळी मंडळात १०४ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Update
Monsoon Rain : पश्‍चिम विदर्भात मॉन्सून सक्रिय, खामगाव, बाळापुरांत अतिवृष्टी

जिल्ह्यात सोमवारी (ता. आठ) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३२.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे आजपर्यंत पडणाऱ्या पावसाने सरासरी गाठली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २१८.७० मिलीमीटरनुसार वार्षिक सरासरीच्या २४.५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मुग, ज्वारी या पिकांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली.

अतिवृष्टीची नोंद झालेले मंडळ

लिंबगाव ८२.२५, आदमपूर ६६.२५, जांब ७२, फुलवळ १३२, दिग्रस बुद्रूक ६९.२५, कुरुळा ६९.२५, माळाकोळी १०४, जलधारा ७७.५०, वाई ६८.

तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

नांदेड ५०, बिलोली ४४.५०, मुखेड ४०.१०, कंधार ५३, लोहा ४२, हदगाव १६.४०, भोकर १.३०, देगलूर ३३.४०, किनवट २८.७०, मुदखेड २५.८०, हिमायतनगर ९.४०, माहूर २७.१०, धर्माबाद २३.१०, अर्धापूर ३८.५०, नायगाव ३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com