Sugarcane Crushing Season : नांदेड विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे ; विभागात ७४ लाख टन उसाचे गाळप; दोन कारखाने बंद

Sugarcane Crushing : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या आटोपतीकडे चालला आहे. विभागातील दोन कारखान्यांचा पट्टा पडला आहे.
Sugar Factory
Sugarcane Crushing Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या आटोपतीकडे चालला आहे. विभागातील दोन कारखान्यांचा पट्टा पडला आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी ७३ लाख ९४ हजार ८७९ टन उसाचे गाळप तर ६८ लाख ९२ हजार ६०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२४-२५ साठी २९ कारखान्यांनी गाळप सुरु केले. यात १९ खासगी तर १० सहकारी साखर करण्याचा समावेश होता. यंदा हंगामाची सुरवात ता. १५ नोव्हेंबरपासून झाली. यंदा विभागातील २९ कारखाने सुरु झाली होती. यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील पाच खासगी व सहा सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे.

Sugar Factory
Sugarcane Crushing : नांदेड विभागात ९४ लाख टन उसाचे गाळप

तसा कारखान्यांचे गाळपही कमी होत आहे. यामुळे विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे चालला आहे. नांदेड विभागातील दोन कारखान्यांचा पट्टा पडला आहे. यात लातूरमधील विकासरत्न विलासराव देशमुख साखर कारखाना लातूर व शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी या दोन कारखान्याचा समावेश आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी ७३ लाख ९४ हजार ८७९ टन उसाचे गाळप तर ६८ लाख ९२ हजार ६०४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती मिळाली. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.३२ टक्के असल्याची माहिती मिळाली.

ट्वेंटीवन शुगर्सची गंगाखेडवर मात
परभणीतील गंगाखेड शुगर हा खासगी साखर कारखाना मागील काही वर्षापासून गाळपात अग्रेसर राहतो. परंतु यंदा मात्र ट्वेंटीवन शुगर्स सायखेडा (ता.सोनपेठ) या कारखान्याने आजपर्यंत पाच लाख ६९ हजार ६१० टन गाळप करून गाळपात विभागामध्ये आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या स्थानी ट्वेंटीवन शुगर्स माळवटी लातूर या कारखान्याने पाच लाख १५ हजार ७०३ टन उसाचे गाळप केले आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या गंगाखेड शुगर्स या कारखान्याने चार लाख ९३ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन
(गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन
नांदेड सहा १३,६७,६७८ १२,७३,९१५
लातूर ११ २८,२६,८५८ २५,९६,६०९
परभणी सात २१,७८,४८५ २०,५६,३८०
हिंगोली पाच १०,२१,८५८ ०९,६५,७००
एकूण २९ ७३,९४,८७९ ६८,९२,६०४
विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.३२ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com