Computerization
ComputerizationAgrowon

Cooperative Institutions Computerization : सहकारी संस्थांच्या संगणकीकरणात नांदेड जिल्हा राज्यात दुसरा

Digital Transformation : सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी व त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची (डीसीडीसी ) जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे.
Published on

Nanded News : सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी व त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची (डीसीडीसी ) जिल्हास्तरावर स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर डीसीडीसीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू आहेत.

या योजनेच्या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ६४ विविध सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याअनुषंगाने ६४ विविध सहकारी संस्था या आता ’गो-लाइव्ह या स्टेजपर्यंत गेलेल्या आहेत. जिल्ह्यात ८४ प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था अर्थात पीएससीस यांनी नागरी सुविधा केंद्र (सीएससी) सूरू केले आहे.

Computerization
Computerization : एक हजार ग्रामपंचायती अजूनही संगणकाविना

गावामध्ये संगणकीय सेवा पुरवितात. जिल्ह्यात प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रासाठी ११ पीएससी पॅक्सची निवड झालेली आहे. तीन ठिकाणी प्रत्यक्ष केंद्र सुरू झालेले आहेत. त्याचप्रमाणे धान्य साठवणूक व प्रक्रिया प्रकल्प या अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सात संस्थानी डिपीआर सादर केलेला आहे. हा डिपीआर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मान्यतेसाठी आहे. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र हे चार संस्थानचे सुरू झालेले आहेत.

Computerization
Computerization : सहकारी सेवा संस्थांचे संगणकीकरणासाठी मान्यता

या विषयी सहकार विभाग समन्वयक असून या कमिटीचे सर्व सदस्य अर्थात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्त, दुग्धविकास अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सहायक आयुक्त (मत्स्यव्यवसाय), जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड, व्यवस्थापकीय संचालक दूधसंघ, व्यवस्थापकीय संचालक मत्स्यपालन संघ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) हे याचे निमंत्रक तथा सदस्य सचिव आहेत.

पुढील काळातही संस्था देणार या सुविधा...

त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती या कुठल्यातरी एका विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अंतर्गत येतील. हे उद्दिष्ट सुद्धा आपले पूर्ण झालेले आहेत. सगळ्या ग्रामपंचायती या कुठल्यातरी सहकारी संस्थेअंतर्गत जोडल्या गेल्या आहेत. आगामी टप्यामध्ये जिल्ह्यातील पाच संस्थांमार्फत पेट्रोलपंप सुरू करण्याविषयी कार्यवाही सुरू आहे. त्याप्रमाणे जिल्हा एलपीजी गॅस वितरणाचे काम देण्याविषयी कार्यवाही सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com