Nagpur Ratnagiri Highway : नागपूर -रत्नागिरी महामार्गाचे काम थांबणार? शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका

Farmers Land : शेतकऱ्यांकडून सरकार भूसंपादन करत आहे परंतु या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.
Nagpur Ratnagiri Highway
Nagpur Ratnagiri Highwayagrowon
Published on
Updated on

Ratnagiri Nagpur Highway Work : कोकणातील रत्नागिरीपासून नागपूरपर्यंतच्या महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील अंकली पूल ते चोकाक याभागातून जाणार आहे. या भागातील शेतकऱ्यांकडून सरकार भूसंपादन करत आहे परंतु या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. अंकली पूल ते चोकाक या ३८ किलोमीटरच्या भूसंपादनाला बाजारभावाच्या चारपट दर द्या अन्यथा रस्ता होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

काल (ता. १८) बुधवारी जैनापूर, निमशिरगाव, तमदलगे, उदगाव व उमळवाडच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर तासभर ठिय्या मांडला. यावेळी भूसंपादन अधिकारी विवेक काळे यांनी ग्रामस्थांची मागणी शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर मागच्या दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन देत मागणी केली.

नागपूर-रत्नागिरी या ९४५ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठीचे ९०७ किलोमीटरचे भूसंपादन हे बाजारभावाच्या चारपट मूल्यांकनाने झाले आहे. मात्र चोकाक ते अंकली या ३८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी मात्र रेडीरेकनरच्या दोन पट दराने नुकसान भरपाई दिली जात आहे.

शासनाने केलेल्या या भेदभावाचा निषेध करत शिरोळ तालुक्यातील पाच गावांचे बाधीत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीअंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Nagpur Ratnagiri Highway
Kolhapur Bauxite Mining : कोल्हापुरात बेकायदेशीर बॉक्साईट उत्खनन, प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका

कृती समितीचे प्रमुख विक्रम पाटील म्हणाले, रेडिरेकरनच्या दोनपट दराने कवडीमोल नुकसानभरपाई मिळणार आहे. बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता गेल्याने त्यांच्या जमिनीचे तुकडे होणार आहेत. तर अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. सध्या दिला जाणारा मोबदला अत्यल्प आहे.

यापूर्वी झालेल्या भूसंपादनानुसार अंकली ते चोकाक येथील बाधितांनादेखील बाजारभावाच्या चौपट रक्कम मिळावी अन्यथा रस्ता होऊ देणार नाही. यावेळी दिग्विजय सूर्यवंशी, सुधाकर पाटील, सन्मती पाटील, विजयकुमार पाटील, विद्याधर कोठावळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com