Kanda Chal : नागाने घेतला कांदा चाळीचा ताबा

Onion Farmer : देवळाणे (ता. सटाणा) येथील शेतकरी महेंद्र काशिनाथ देवरे यांच्या कांदा चाळीत नागाने ताबा घेतला होता
Snake
SnakeAgrowon

Satana News : दुपारी शेतकरी, शेतमजुरांची विश्रांतीची वेळ...अन् अचानक सळसळत एक नाग कांदा चाळीत शिरला...लहान बालकाच्या नजरेस तो नाग पडला आणि कुटुंबातील सदस्यांनी चाळीकडे धाव घेतली. तोपर्यंत नागाने संपूर्ण चाळीचा ताबा घेतला त्याचा फणा पाहून कुणाचीही पुढे जाण्याची हिमंत होईना, अखेरीस सर्पमित्राला बोलावून नागाला पकडून सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.

Snake
Onion Procurement : ‘एनसीसीएफ’ कांदा नेमका कुठे खरेदी करतयं ?

देवळाणे (ता. सटाणा) येथील शेतकरी महेंद्र काशिनाथ देवरे यांच्या पाटी शिवारात (गट क्र.१६१) ही घटना घडली. देवरे कुटुंबीय सकाळपासून शेतातील कामात व्यग्र होते. दुपारी विश्रांतीसाठी शेतातील घरात बसले असताना देवरे यांच्या दुसरीत शिकणारा मुलगा घराजवळील ट्रॅक्टरवर खेळत होता. अचानक त्याला सळसळत जाणारा मोठा नाग दिसला.

त्याने कुटुंबातील सदस्यांना याबाबत माहिती दिली. नाग शेजारील कांदा चाळीत शिरला होता. देवरे कुटुंबीयांनी आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना आवाज दिला. तोपर्यंत इकडे नागाने फणा काढून कांदा चाळीचा ताबा घेतला होता.

फणा पाहून एकाचीही पुढे जायची हिंमत होत नव्हती. जमलेल्या शेतकऱ्यांतील एकाने सर्पमित्राला बोलावले. काही वेळातच सर्पमित्र आला. त्याने कांदा चाळीवरील प्लॅस्टिक कागद अलगद बाजूला केला आणि नागाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. अखेरीस सर्पमित्राने नागाला पकडण्यात यश मिळवले. सर्पमित्राने नागाला त्याच्या आधिवासात सुखरूप सोडले त्यानंतर देवरे कुटुंबीयांनी निश्वास सोडला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com