Satara News: शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘नाफेड’च्या वतीने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सातारा, वाई व वडूज येथे खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांनी दिली..शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार सोयाबीन खरेदीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे..Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी.आधारभूत किमतीने ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यासाठी राज्य पणन महासंघ व ‘नाफेड’मार्फत कोरेगाव, सातारा, फलटण, वाई व कराड येथील तालुका सहकारी खरेदी-विक्री संघांना,मसूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली असून नव्याने वडूज (ता. खटाव) येथे खरेदी-विक्री संघ, सातारा येथे जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संघ लि., सातारा व कवठे (ता. वाई) येथे समृद्धी सहकारी संस्था या तीन केंद्रांस मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या ९ झाली आहे..कोरेगाव, फलटण, वाई व मसूर येथील केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असून, आतापर्यंत कोरेगाव केंद्रावर ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ३३३ शेतकऱ्यांची ४०७० क्विंटल, फलटण केंद्रावर २११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १९२ शेतकऱ्यांची २३४७ क्विंटल, वाई केंद्रावर १७५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून १४८ शेतकऱ्यांची १५२० क्विंटल व मसूर केंद्रावर ९२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ८२ शेतकऱ्यांची ९८८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे..Soybean Procurement: हमीभावाने ४ लाख ४२ हजार क्विंटलवर सोयाबीन खरेदी.जिल्ह्यात एकूण ७५५ शेतकऱ्यांकडून एकूण ८९२६ क्विंटल खरेदी झालेली आहे. तसेच पणन मंडळाकडून मंदप्रभा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि., शिखर शिंगणापूर (ता. माण) येथे, संकल्पपूर्ती ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी कोरेगावतर्फे (हिवरे, ता. कोरेगाव), येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे वर्धनगड (पुसेगावजवळ, ता. खटाव, जि. सातारा) या केंद्रावर सोयाबीन खरेदी चालू आहे. सोयाबीन विक्रीकरिता आपल्या गावाजवळील ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’, पणन मंडळाच्या नजीकच्या शेतीमाल खरेदी केंद्रावर जाऊन सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेऊन प्रथम सोयाबीनची नोंदणी करून घ्यावी..नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीने पॉझ मशीनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा, पीकपेरा इ. कागदपत्रांसह नोंदणीकरिता प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी हनुमंत पवार, जिल्हा पणन अधिकारी, संबंधित खरेदी-विक्री संघ, तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. सुद्रीक यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.