पाटणा ः नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) (NABARD) भोजपूरच्या उदवंतनगरचा ‘खुर्मा’, गयाचा ‘तीळकूट’ आणि सीतामढी जिल्ह्यातील स्वादिष्ट ‘बालूशाही’ (BAlushahi) साठी भौगोलिक निर्देशांक (जीआय) (GI Rating) मानांकन मिळवून देण्यासाठी उत्पादक/उत्पादक संघटनेला मदतीसाठी पुढाकार घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नाबार्ड-बिहारचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही ‘खुर्मा’, ‘तीळकूट’ आणि ‘बालूशाही’साठी भौगोलिक निर्देशांक मानांकन मिळवणाऱ्या उत्पादक/उत्पादक संघटनांना मदत करत आहोत. उत्पादकांकडून लवकरच या उत्पादनांसाठी जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज दाखल केले जातील. आम्ही या तीन उत्पादनांसाठी ‘जीआय’ नोंदणीसाठी अर्जदार असणाऱ्या उत्पादकांच्या संघटनेची नोंदणी सुलभ करण्याच्या प्रक्रियेत आहोत.
यापूर्वी बिहारमधील तीन अर्ज नुकतेच जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्री (चेन्नई) कडे दाखल करण्यात आले आहेत, ज्यात हाजीपूरच्या प्रसिद्ध ‘चिनिया’ जातीची केळी, नालंदाची लोकप्रिय ‘बावन बुटी’ साडी परंपरा आणि गयाच्या ‘पत्थरकट्टी स्टोन क्राफ्ट’ला जीआय मानांकन मिळावे यासाठी नाबार्डकडून पाठिंबा देण्यात आला आहे. हाजीपूर केळी, नालंदाची बावन बुटी साडी परंपरा आणि गयाच्या दगडी कलाकृतींना भौगोलिक निर्देशांक मानांकन लावणारे अर्ज शेतकरी, विणकर आणि संबंधित क्षेत्रातील कुशल कारागिरांशी संबंधित संघटनांनी नाबार्डच्या मदतीने आधीच दाखल केले आहेत, असे कुमार यांनी पीटीआयला सांगितले. ते म्हणाले, नाबार्ड-बिहारने या प्रदेशातील खुर्मा, तीळकूट आणि बालूशाहीसह सहा संभाव्य उत्पादने भौगोलिक निर्देशांकांतर्गत नोंदणीकृत केली आहेत. बिहार हे चवीचे राज्य आहे, जिथे आपल्याला स्वादिष्ट खाद्यपदार्थ मिळू शकतात. नाबार्ड भौगोलिक निर्देशांक नोंदणी प्रक्रियेत आणि त्या नंतरच्या उपक्रमात मार्केटिंग लिंकेज, ब्रँडिंग, प्रमोशन आणि विशिष्ट भौगोलिक निर्देशांक धोरण आणि योजना असलेली देशातील पहिली मान्यताप्राप्त संस्था म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या उत्पादनांना जीआय मानांकन आवश्यक
भोजपूरचा खुर्मा परदेशी लोकांना खूप आवडतो. आतून गोडवा सोबत इतका रसाळ आहे की त्याची चव जिभेतून थेट हृदयापर्यंत पोहोचते. गयाच्या प्रसिद्ध तीळकूटच्या बाबतीतही असेच आहे. तीळकूट, तीळ आणि गुळापासून बनवलेली एक अनोखी ट्रीट आणि देशाबाहेरही खूप लोकप्रिय आहे. सीतामढीतील रुन्नी सैदपूर या गावातील बालूशाही ही नाजूक गोड गोडी देशात खूप लोकप्रिय आहे. बिहारच्या या उत्पादनांना भौगोलिक निर्देशांक मानांकन मिळणे आवश्यक आहे, असे सुनील कुमार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.