Maharashtra Politics : ‘मविआ’चे नेते एकमेकाला हरविण्यासाठी प्रयत्नशील

Piyush Goyal : २३ तारखेला निकाल आल्यानंतर मागील वेळेपक्षा या वेळी जास्त जागा आम्ही जिंकू, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडी महाराष्ट्रातील नागरिकांची दिशाभूल करत आहे, ही महाविकास आघाडी नसून महाविनाश आघाडी आहे. तीन पक्ष एकमेकांच्या उमेदवारांना हरविण्यासाठी काम करत आहेत, त्यामुळे २३ तारखेला निकाल आल्यानंतर मागील वेळेपक्षा या वेळी जास्त जागा आम्ही जिंकू, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे विचारांशी फारकत घेऊन केवळ मुलगा आदित्यला प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केली.कफ परेड येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री गोयल म्हणाले, ‘‘सर्वसामान्यांच्या जीवनात उन्नती आणण्याचा भाजपने प्रयत्न केला.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: ऐन प्रचाराच्या धामधुमीत काँग्रेसचा बंडखोरांना धक्का; एकाच वेळी १६ जणांवर कारवाई

त्यामुळेच तीसऱ्यांदा आम्हाला तिप्पट वेगाने सरकार आणण्यास कौल दिला. आमचे सरकार प्रत्येक वर्गाचा विचार करणारे आहे. मी मागील महिन्यापासून मुंबई आणि महाराष्ट्रात फिरतो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या महायुती सरकारबद्दल लोकांचे चांगले मत आहे.

आमची महायुतीच बहुमताने विजय मिळवेल. महाविकास आघाडी ही महाविनाश आघाडी आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनांवर कुणाचा विश्वास राहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासहेब ठाकरे यांच्या विचारांशी फारकत घेतली आहे. काँग्रेससमवेत जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन, असे बाळासाहेब म्हणाले होते.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : आमचा जाहीरनामा ‘जुमला’ नाही, तर आमची ‘गॅरेंटी’ : पवार

मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी आणि मुलाला प्रस्थापित करण्यासाठी हिदुत्वाला लाथ मारून शिवसेनेचा विचार २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी उद्ध्वस्थ केला. त्यामुळे लोकांचा त्यांचावरचा विश्वास उडाला आहे. महायुतीचे घटकपक्ष एकजुटीने प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पक्ष खोटी आश्वासने देण्यात पटाईत आहे. देशातील विविध राज्यांत महिलांना दिलेली आश्वासने त्यांनी पाळली नाहीत.

हिमाचल, तेलंगणा, कर्नाटकात त्यांची पोलखोल झाली आहे. शेतकरी, युवा आणि लोकांना भ्रमित केले आहे. यांची आश्वासने पाहता त्यांचे खरे रूप लोकांच्या लक्षात आले आहे. महायुतीच राज्याचे भविष्य उज्ज्वल करू शकते. वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती पाहता महायुती खूप पुढे गेली आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि अन्य नेते जसा दौरा करतील तसतसा महायुतीचा पाठिंबा वाढत जाईल. धर्म आणि जातींमध्ये फूट पाडण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे.’’

बटेंगे ते कटेंगे असा नारा भाजपकडून दिला जात आहे. तर पंतप्रधान मोदी यांनीही तोच धागा पकडला असल्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘देशातील १४० कोटी जनतेने एकत्र राहिले पाहिजे, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला होता. महााराष्ट्राची १२ कोटी जनता एकजूट होईल, तर कुणीही वाकडी नजर करून पाहणार नाही, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.’’

‘मविआमध्ये पाडापाडी सुरूय’

महाविकास आघाडीचे नेते विजयाचा दावा करत आहेत, याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘वस्तुस्थिती वेगळी आहे. सध्या उद्धव ठाकरे गट, शरद पवार यांच्यासमवेत जे काही मोजके लोक राहिलेत ते आणि काँग्रेसचे नेते एकमेकांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्यामुळे आम्हाला प्रचंड यश मिळेल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com