Wardha News : लालपरी कुठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल, या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून, त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. वर्धा विभागातील २११ बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे एसटीचे थेट लोकेशन आता घरबसल्याच कळणार आहे.
अॅपद्वारे कोणती एस.टी. बस किती वाजता पोहोचणार, कोणती बस अचानक रद्द झाली, या प्रश्नांची उत्तरे आता सहज मिळणार आहेत. तसेच एस.टी.ची तासन्तास करावी लागणारी प्रतीक्षा इतिहासजमा होऊ शकते. त्यासाठी अँड्रॉईड मोबाइलमधील ‘प्ले स्टोअर’मधून महामंडळाचे ‘एमएसआरटीसी अॅप’ डाऊनलोड करावे लागणार आहे.
या अॅपद्वारे एसटीची वाट बघणे, एस.टी. रद्द होणे, बिघाड होऊन बंद पडणे, आकस्मिक खोळंबा आदी बाबी प्रवाशांना कळणार आहेत. त्यामुळे एस.टी.ची वाट पाहणे संपणार आहे. एखाद्या मार्गावरील, एखादी एस.टी. बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, याची माहिती या अॅपद्वारे घरबसल्या समजणार आहे.
एस.टी. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणींमुळे वेळेनुसार बसस्थानकावर पोहोचायला विलंब होत असल्यास त्याची माहितीदेखील अॅपद्वारे समजणार आहे. महामंडळाच्या ताफ्यातील २११ बसगाड्यांना जीपीएस सिस्टीम बसवली असून प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
अनधिकृतपणे बस कुठे थांबविली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तेथे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ बस थांबविली जातेय का, याचीदेखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.